Photo of Naralibhaat by Sanika SN at BetterButter
161
0
0.0(0)
0

नारळीभात

Aug-27-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळीभात कृती बद्दल

रक्षाबंधन व नारळीपौर्णिमेसाठी खास बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 8

  1. २ वाटया बासमती तांदुळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावे.
  2. ३ वाटया चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
  3. ३ वाटया खवलेले ओले खोबरे
  4. ५-६ लवंगा
  5. ४-५ दालचिनीच्या काड्या
  6. ३-४ टेस्पून साजूक तुप
  7. २ टीस्पून वेलचीपूड
  8. १/४ टीस्पून केशर
  9. सुकामेवा - काजू, बदामाचे काप, बेदाणे, आपल्या आवडीप्रमाणे.

सूचना

  1. भांड्यात १ टेस्पून तुप गरम करुन त्यात काजू सोनेरी रंगवार परतणे व बाजूला काढून ठेवणे.
  2. पुन्हा त्याच भांड्यात लवंगा व दालचिनी परतून घेणे.
  3. मग त्यात निथळत ठेवलेले तांदुळ घालून चांगले परतणे व पाणी घालून भात शिजवून घेणे.
  4. शिजवलेला भात ताटात काढून, पसरवून गार होऊ दयावा. त्यात गुळ व ओले खोबरे एकत्र करुन घेणे.
  5. जाड बुडाच्या भांड्यात २ टेस्पून तुप गरम करुन शिजवलेला भात व गुळ-खोबरे थोडे-थोडे करुन घालावे व हल़क्या हाताने एकत्र करावे.
  6. एक- दोन वाफा आणाव्यात. त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड, केशर घालून, झाकून गुळ वितळेपर्यंत ५ -६ मिनिटे शिजवावे.
  7. आवडत असल्यास वरून एक चमचा साजूक तुप सोडावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर