Photo of Naralibhat by Archana Lokhande at BetterButter
466
3
0.0(0)
0

नारळीभात

Aug-27-2018
Archana Lokhande
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळीभात कृती बद्दल

नारळीपोर्णिमेनिमित्त बनवला जाणार एक पारंपरिक पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. तांदूळ २ वाट्या
  2. गुळ १ -१ १/२ वाटी
  3. खोवलेले खोबर १ १/२ वाटी
  4. नारळाचे दुध २ -३ वाटी
  5. काजू-बदाम-वेलची पुड
  6. लवंग ५
  7. दालचिनी छोटा तुकडा
  8. तूप ३-४ चमचे

सूचना

  1. प्रथम नारळ खोवून घेतला.
  2. गुळ किसून घेतला.
  3. नारळाचे दुध काढून घेतले.
  4. तांदूळ धुवून घेतला.
  5. आता एका पातेल्यात तूप गरम करून काजू आणि बदाम तळून बाजूला काढून ठेवले.
  6. पुन्हा त्याच तूपात लवंग आणि दालचिनी परतून घेतली.
  7. नंतर त्यात धुतलेला तांदूळ घालून परतून घेतला.
  8. त्यात नंतर नारळाचे दुध घालून भात जवळजवळ 90% टक्के शिजवून घेतला.
  9. भातात किसलेला गुळ, खोवलेले खोबरे घालून एकजीव करून घेतले.
  10. थोडे तूप टाकले आणि त्यात तळलेले काजू, बदाम,वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेतला
  11. वर झाकण ठेवून भात शिजवून घेतला.
  12. आणि आता चविष्ट अशा नारळीभात तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर