मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणीचे वडे

Photo of Bhajaniche Vade by Sanika SN at BetterButter
1630
3
0.0(0)
0

भाजणीचे वडे

Sep-03-2018
Sanika SN
59 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणीचे वडे कृती बद्दल

श्रावणात मंगळागौरीला प्रसादासाठी हे वडे बनवण्याचा प्रघात आहे. थालिपीठाच्या भाजणीपासून बनणारा पौष्टिक प्रकार.

रेसपी टैग

  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. २ वाट्या थालीपिठाची भाजणी
  2. १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  3. दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
  4. १ टीस्पून पांढरे तीळ
  5. १/२ टीस्पून ओवा
  6. मीठ चवीनुसार
  7. २ टेबलस्पून्स कडकडीत तेलाचे मोहन
  8. तेल वडे तळण्याकरीता

सूचना

  1. मिक्सिंग बाऊलमध्ये भाजणी, लाल तिखट, कोथिंबीर, ओवा, तीळ व मीठ एकत्र कारावे.
  2. त्यात कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करणे.
  3. कोमट पाण्याने भाजणीचे पीठ मळावे व झाकून तासाभरासाठी ठेवावे.
  4. तासाभराने पुन्हा चांगले मळून १० -१२ एकसारखे गोळे तयार करावे.
  5. फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे.
  6. प्लास्टिक शीटवर पाण्याचा हात लावून गोलाकार वडे थापावे, मधोमध बोटने भोक पाडावे.
  7. मध्यम - हाय आचेवर सर्व वडे सोनेरी रंगावर खमंग तळून घ्यावे.
  8. हे वडे तुम्ही लोण्यासोबत किंवा साजूक तुपासोबत किंवा दही + पुदिना चटणी + टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर