Photo of Aamrakhand by Sanika SN at BetterButter
381
2
0.0(0)
0

आम्रखंड

Sep-03-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आम्रखंड कृती बद्दल

चक्का आणि आमरसाची गोड सागंड आपल्या पानाची शोभा व लज्जत वाढवते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या तयार चक्का
  2. १ वाटी हापूस आंब्याचा रस
  3. १/२ वाटी पिठीसाखर (प्रमाण आपया आवडीप्रमाणे बसवावे)
  4. १ टीस्पून वेलचीपूड
  5. १/२ टीस्पून जायफळपूड
  6. केशर
  7. चारोळी आणि इतर सुकामेवा, चिरलेले आंब्याचे तुकडे सजावटीसाठी 

सूचना

  1. एका भांड्यात चक्का घ्यावा. त्यात पिठीसाखर व आंब्याचा रस थोडा-थोडा करुन घालून एकत्र करावे.
  2. आंब्याचा रस जास्तं घातल्याने आम्रखंड थोडे पातळ होते, तुम्हाला तसे आवडत असल्यास तुम्ही जास्तं रस घालू शकता.
  3. मला लपका पडेल इतके घट्ट, हलके व मुलायम आम्रखंड आवडते त्यानुसार मी आंब्याचा रस मिसळला आहे.
  4. आता त्यात वेलचीपूड, जायफळपूड, केशर व चारोळी घालून एकत्र करावे.
  5. वरून सुकामेवा व चिरलेले आंब्याचे तुकडे घालून सजवावे.
  6. गरमा-गरम पुर्‍यांसोबत गार आम्रखंड सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर