मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठलं भाकरी

Photo of Pithale Roti by SUCHITA WADEKAR at BetterButter
2337
0
0.0(0)
0

पिठलं भाकरी

Sep-04-2018
SUCHITA WADEKAR
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठलं भाकरी कृती बद्दल

पिठलं भाकरी हा पारंपारिक मेनू आहे. गरीबांची शिदोरी म्हणतात हिला, असे असले तरी पिठलं भाकरी ही बऱ्याच जणांना आवडते. शहरातील लोक तर तुटून पडतात यावर कारण हल्लीच्या बिझी शेड्युलमुळे पिठलं भाकरी हा मेनू शहरी लोकांच्या रोजच्या आहारातून वर्जच झालाय जणू, त्यामुळे मोठया मोठ्या हॉटेलमध्ये मुख्य जेवणामध्ये स्थान दिले आहे या पिठलं भाकरीला. लोकं आवर्जून पिठलं भाकरी खाण्यासाठी जातात अशा हॉटेल मध्ये. तसेच पुण्याजवळील सिंहगड किल्यावर हा मेनू खूप प्रसिद्ध आहे. तिथे सोबत कांदा भजी देखील असतात आणि मसाला ताक देखील असते. असाच फक्कड मेनू आज तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेय. कसा वाटला नक्की कळवा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● 1 वाटी डाळीचे पीठ (बेसन)
  2. ● 1 कांदा
  3. ● 3 ते 4 हिरव्या मिरच्या
  4. ● 4 लसूण पाकळ्या
  5. ● अर्धा चमचा जिरे
  6. ● मोहरी अर्धा चमचा
  7. ● हिंग अर्धा चमचा
  8. ● हळद एक चमचा
  9. ● कढीपत्ता
  10. ● कोथिंबीर
  11. ● मीठ
  12. ● पाणी

सूचना

  1. 1. प्रथम एका पातेल्यात डाळीचे पीठ घेऊन त्यात पाणी घालून पातळ करून त्यामध्ये हळद, मीठ घालावे.
  2. 2. कांदा बारीक चिरून घ्यावा.
  3. 3. मिरची, लसूण, थोडे मीठ आणि जिरे यांचे मिक्सरला वाटण करून घ्यावे.
  4. 4. गॅसवर कढईत 4 चमचे तेल घालून मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता यांची फोडणी द्यावी.
  5. 5. यानंतर यात मिक्सरमध्ये केलेले जिरे, लसूण, मिरचीचे वाटण घालून परतावे.
  6. 6. यानंतर यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि परतावे.
  7. 7. यानंतर यात 4-5 वाट्या पाणी घालावे व मिठ घालून एक उकळी येऊ द्यावी.
  8. 8. उकळी आल्यावर यात पाणी घालून पातळ केलेले डाळीचे पीठ ओतावे आणि सर्व व्यवस्थित एकत्र करून झाकण ठेवावे.
  9. 9. पाच मिनिटांनी झाकण काढून वरून कोथिंबीर पेरून हलवावे आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवावे.
  10. 10. दोन मिनिटांनी गॅस बंद करावा, आपले पिठलं तयार झाले.
  11. 11. मसाला ताक, कांदा आणि ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर