मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदापात झुणका

Photo of ZUNKA by Samiksha Mahadik at BetterButter
770
1
0.0(0)
0

कांदापात झुणका

Sep-04-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदापात झुणका कृती बद्दल

आपण नेहमी झुणका करतो तसाच आहे फक्त त्यात मी कंदयाची पात घालते चवीला खूप छान लागतो माझा मुलगा कांदापात भाजी खात नाही पण हा झुणका आवडीने खातो :blush:

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी बेसन
  2. 1 वाटी कांदापात बारीक चिरून
  3. कोथिंबीर बारीक चिरून
  4. 1 बारीक चिरलेला कांदा
  5. आलं लसूण हिरवी मिरची व कोथिंबीर पेस्ट 2 चमचे
  6. मोहरी
  7. हळद
  8. तिखट
  9. मीठ
  10. तेल

सूचना

  1. प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला ती तडतडली पाहिजे
  2. मग त्यात आलं लसूण हिरव्या मिरच्या व कोथिंबीर पेस्ट 2 चमचे घाला त्यातच फोडणीत थोडी कोथिंबीर घाला व छान खमंग परतून घ्या
  3. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला व छान सोनेरी रंगावर परतून घ्या
  4. मग त्यात हळद, तिखट घाला व परारून घ्या मग त्यात बारीक चिरलेली कांदापात घाला
  5. ती छान परतून घ्या
  6. मग त्यात सुके बेसन व चवीनुसार मीठ घाला व छान मिक्स करून घ्या
  7. त्यात हाताने थोडे थोडे पाणी शिंपडून ते व्यवस्थित परतून घ्या
  8. झाकण ठेवून वाफेवर शिजवणे. मधून मधून पाणी शिंपडून ते छान मोकळे शिजवून घेणे
  9. 10 ते 12 मिनिटात छान मोकळा झुणका शिजतो
  10. मग भाकरीसोबत सर्वे करणे. हा झुणका चवीला खूप छान लागतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर