Photo of Aluwadi by Teju Auti at BetterButter
840
4
0.0(0)
0

अळुवडी

Sep-06-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळुवडी कृती बद्दल

Maharastrian authentic dish

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १० अळुची पाने
  2. १ वाटी बेसन
  3. २ मोठे चमचे तांदळाचे पीठ
  4. ४ हिरवी मिरची, लसुण, जिरे
  5. हिंग, मीठ
  6. पाणी, तेल
  7. धने पावडर , हळद
  8. सफेद तीळ,

सूचना

  1. पाने स्वच्छ धुवून त्याच्या मागच्या शिरा कापून घ्याव्यात व हिरवी मिरची, लसुण ,जिर वाटून घ्यावे.
  2. चाळणी वर बसेल अश्या टोपात पाणी गरम करायला ठेवावे.
  3. एका वाडग्यात पीठ , वाटण, धने पावडर, हळद, मीठ, लिंबू, हिंग, व तीळ टाकून भजीला भिजवतो इतपत पीठ भिजवावे.
  4. एका परातीच्या मागे शिरावर अस पान ठेवून त्याला तेल लावून पीठ लावावे. व परत दुसरे पान तसेच उलटे ठेवून त्यावर मिश्रण लावावे.पाचही पाने तशीच करावीत. खालच्या बाजूकडून लहान बाजूला घट्ट गुंडाळी करावी. गुंडाळताना थोडे थोडे मिश्रण लावावे.
  5. वडी वळल्यावर चाऴणी ला तेलाचा हात लावून चाळणी टोपावर ठेवून झाकण ठेवावे व २५ मिनिट शिजवावे.
  6. थंड झाल्यावर वडी कापून तव्यावर शँलो फ्राय करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर