मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठलं आणि ज्वारीची भाकरी .

Photo of Pithale & jwarichi bhakri, by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
2815
2
0.0(0)
0

पिठलं आणि ज्वारीची भाकरी .

Sep-08-2018
Sonali Belose-Kayandekar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठलं आणि ज्वारीची भाकरी . कृती बद्दल

मैत्रीणिंनो मी आज तुमच्या साठी पिठलं आणि भाकरीची मेजवानी घेऊन आले आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १वाटी चणाडाळीचे पिठ
  2. १मध्यम कांदा बारिक चिरून
  3. ४/५ हिरव्या मिरच्या बा.चिरून
  4. ५/६ लसुण पाकळ्या ठेचून
  5. कढिपत्ता फोडणी साठी
  6. १/४ चमचा मोहरी
  7. १/४ चमचा जिरे
  8. १/४ चमचा हळद
  9. हिंग फोडणी साठी
  10. १डाव तेल
  11. पाणी
  12. चवीप्रमाणे मीठ
  13. कोथिंबीर पाव वाटी
  14. ज्वारीचे पिठ भाकरी साठी
  15. गरम पाणी

सूचना

  1. प्रथम डाळीचे पिठ पाण्यात एकजिव करून बाजूला ठेवा
  2. कढईत तेल घ्या .
  3. तेल तापल्यावर मोहरी ,जिरे कढिपत्याची फोडणी करा
  4. नंतर लसुण पाकळ्या ठेचून घाला
  5. लसणीचा रंग बदलला की मिरच्या परतुन घ्या
  6. कांदा घाला .चांगला परतुन घ्या .हिंग घाला
  7. फोडणीत हळद घाला म्हणजे पिठल्याला रंग छान येतो
  8. आता पाण्यात एकजिव केलेले पिठ घाला
  9. व्यवस्थित ढवळून घ्या
  10. चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवा पिठले वाफेवर शिजू दे.
  11. आच मंद ठेवा
  12. अधुनमधून.ढवळून पहा.म्हणजे पिठले भांड्याला चिकटणार नाही
  13. १० मिनिटांनी आच बंद करा.
  14. वरून कोथिंबीर घालावी
  15. पिठले तयार आहे
  16. आता एका परातीमध्ये ज्वारीचे पिठ घ्या .
  17. त्यात गरम पाणी घालून मळून घ्या .परातीमध्ये भाकरी थापून ती भाजून घ्या .
  18. भाकरी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर