मुख्यपृष्ठ / पाककृती / महाराष्ट्रीयन अंडाकरी

Photo of Maharashtrian Anda curry by Lata Lala at BetterButter
1116
1
0.0(0)
4

महाराष्ट्रीयन अंडाकरी

Sep-10-2018
Lata Lala
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

महाराष्ट्रीयन अंडाकरी कृती बद्दल

सादी, सोपी आणि तिखट अंडा करी

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. वाटणासाठी - 2 मध्यम कांदा (उभा चिरून)
  2. किसलेले दोन टोमॅटो
  3. सुकं खोबरं 2 चमचा
  4. आलं- 1 तुकडा
  5. लसूण 8
  6. मिरची 2
  7. खसखस 1 चमचा
  8. बडीशेप 1 चमचा
  9. भाजलेला चणा/फुटाना 2 चमचा
  10. तेल 4 चमचा
  11. अर्धा चमचा हळद
  12. १ १/४ टीस्पून लाल तिखट
  13. एक चमचा धने पूड,
  14. एक चमचा जिरे पूड
  15. चवीनुसार मीठ
  16. बारीक चिरलेली कोथिंबीर
  17. अंडी उकळलेले 6
  18. गरम पाणी 1+1/2 गिलास
  19. सुक्का मसाला साठी :
  20. तेज पान 1
  21. दोन लाल मिरच्या,
  22. ३ लवंगा,
  23. १" दालचिनीचा तुकडा
  24. १/२ टीस्पून शहाजिरे
  25. ६-७ काळे मिरी
  26. चार लवंग,
  27. १ टीस्पून धने
  28. वेलची 1
  29. दालचिनी 1 तुकडा

सूचना

  1. तेलात कांदा गोल्डन ब्राऊन  होईपर्यंत भाजून घ्या.
  2. मग त्यात सुकं खोबरं, भाजलेला चणा, खसखस, आणि आलं-लसूण मिरची घाला आणि खरपूस भाजून घ्या.
  3. मिश्रण थंड झालं कि थोडं पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
  4. सुक्का मसाला साठी एका कढईत गरम करून सर्व खडे मसाल्यात घाला.
  5. सुगंधी होईपर्यंत कमी गॅस वर मसाले भाजून गेहणे
  6. मसाल्यांना थंड करून त्यात मिक्सर ला भुकं करणे
  7. उकडलेले अंड्याचा वरील भागात चाकूने क्रॉस करून घ्या.
  8. कढईत तेल गरम करून अंडी हलक्या रंग येईपर्यंत तळून घ्या.
  9. काढुन बाजूला ठेवा
  10. कढईत उरलेलं तेल मध्ये तेज पान टाकणे
  11. मंद आंचे वर आधी वाटलेला सुक्का मसाला घालून परता
  12. त्यात टोमॅटो घालून परता. चांगले मिक्स करा
  13. नंतर ओला वाटलेला मसाला घालून परता.
  14. हळद, धने जीरा, मीठ आणि तिखट घाला आणि तेल सुटेपर्यंत परता
  15. आवडीप्रमाणे गरम पाणी घालून थोडं पात्तळ करा.
  16. मग उकडलेल्या अंड्यांना, करी मध्ये सोडा.
  17. पाच मिनिटे झाकून ठेवा. नंतर उतरवून घ्या.
  18. कोथिंबीर टाकून सजवा आणि गरमागरम पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर