मुख्यपृष्ठ / पाककृती / वरण-भात आणि तूप

Photo of Dal rice with ghee by Manasvi Pawar at BetterButter
971
2
0.0(0)
0

वरण-भात आणि तूप

Sep-11-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरण-भात आणि तूप कृती बद्दल

महाराष्ट्रीय जेवण म्हटलं की पहिला क्रमांक लागतो तो याच पदार्थाचा ....हाॅटेलमधल कितीही चवदार जेवण असलं तरी या घरगुती गरमगरम वरणभाताची सर त्याला नक्कीच नाही.... आणि त्यावर घरगुती साजूक तूपाची धार...अहाहा...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तांदूळ
  2. १/२ वाटी तुरीची डाळ
  3. पाव चमचा जिरे
  4. चिमूटभर हिंग
  5. मीठ चवीनुसार
  6. एक चमचा तेल
  7. दोन चमचे साजूक तूप
  8. थोडी कोथिंबीर

सूचना

  1. तांदूळ आणि डाळ निवडून धुवून घ्या
  2. कुकरमध्ये दोन वेगवेगळ्या भांड्यात गरजेनुसार पाणी घालून डाळ आणि तांदूळ घ्या
  3. डाळीमध्ये जिरे हिंग आणि हळद आणि एक चमचा तेल घाला
  4. कुकरमध्ये तळाला थोडं पाणी घाला
  5. आता आधी डाळीचा डबा ठेवा त्यावर तांदूळ असलेला डबा ठेवा
  6. कुकर चे झाकण लावून गॅस चालू करून कुकर ठेवा
  7. तीन शिट्या काढून गॅस बंद करा
  8. कूकरची वाफ पूर्ण निघून गेली की डाळीचा डबा बाहेर काढून शिजलेला भात कुकरमध्ये राहू द्या
  9. शिजलेल्या डाळीला रवीने घुसळून घेऊन त्यामध्ये थोडे मीठ आणि पाणी घालून उकळी काढा
  10. आता एका प्लेटमध्ये भाताची मूद आणि त्यावर वरण घालून तूपाची धार घालून मारा ताव

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर