Photo of Dhapate by Manasvi Pawar at BetterButter
767
0
0.0(0)
0

धपाटे

Sep-11-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धपाटे कृती बद्दल

ही रेसिपी मी माझ्या शेजारच्या मावशींकडून शिकले.लहानपणी खाल्लेल्या त्यांच्या हाताची चव अजूनही आठवते.अजूनही त्यांच्यासारखे नाही जमत.. कदाचित त्यांच्या हाताची जादु आहे ती.कोकणात थालीपीठ तर सातारा भागात त्यालाच धपाटे म्हणतात बघू पटकन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन वाट्या भाजणीचे पीठ
  2. १/२ वाटी कोथिंबीर बारीक चिरून
  3. एक चमचा जिरे
  4. चार पाच हिरव्या मिरच्या तिखट
  5. दहा बारा लसूण पाकळ्या
  6. थोडं आल
  7. हळद पाव चमचा
  8. तेल भाजण्यासाठी
  9. दही

सूचना

  1. आलं मिरची जिरे आणि लसूण मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यावे
  2. आता एक ताटात दोन वाट्या भाजणीचे पीठ मिरची लसूण भरड मीठ हळद आणि कोथिंबीर घालून एकजीव करावे
  3. त्याचा असा गोळा तयार होतो
  4. आता यांचे लाडूपेक्षा मोठे गोळे करून पाणी लावून रुमालावर थापावे
  5. आणि तवा गरम करून धपाटे तेल घालून तव्यावर टाकावेत
  6. दोन्ही बाजूंनी भरपूर तेल घालून भाजून घ्यावे
  7. गरमागरम धपाटे दह्याबरोबर खाण्यासाठी द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर