मुख्यपृष्ठ / पाककृती / तवसाळे किंवा धोंडस

Photo of tavsaale or dhondas by supriya padave (krupa rane) at BetterButter
1731
2
0.0(0)
0

तवसाळे किंवा धोंडस

Sep-14-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तवसाळे किंवा धोंडस कृती बद्दल

हा कोंकणातला एक गोड पदार्थ आहे गणपतित गावी मोठ्या हिरव्या रंगाच्या काकड़ी मिळतात त्या पासून हा पदार्थ बनविला जातो ,काकड़ी ला मालवणी भाषेत तवसा म्हटले जाते म्हणुन ह्याचे नाव तवसाळे.पारंपारिक पद्धतित यात तांदुळ चा रवा वापरतात पण मी यात इडली रवा वापरला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन वाटी इडली रवा
  2. दोन वाटी किसलेली काकड़ी
  3. दीड वाटि गुळ
  4. पाव वाटी ओले खोबरे
  5. पाव चमचा हळद
  6. अर्धा चमचा वेलचि पूड
  7. एक चिमुट मीठ
  8. थोडासा सुका मेवा
  9. तीन चमचे तूप
  10. पाणी

सूचना

  1. काकड़ी साल काढून किसुन घ्या , ओले खोबेरे किसुन घ्या ,गुळ बारीक चिरुन घ्या
  2. एका भांड्यात तूप टाकून रवा गुलाबी रंगावर भाजुन घ्या व् बाजूला ठेवून दया
  3. आता त्याच भांड्यात काकडी चा किस, गुळ ,खोबरे व् सुका मेवा , हळद ,मीठ, वेलचि पूड टाकून चांगले शिजवून घ्या . साधारण दहा मिनिटांत सगळे चांगले शिजते
  4. आता हयात भाजलेला रवा व् एक ग्लास पानी टाका व् शिजु दया ,पाच ते सात मिनिटांत ह्या मिश्रणा चा गोळा बनतो
  5. आता हे मिश्रण तूप लावलेल्या एका जाड बुडाच्या भांड्यात पसरवा
  6. एक लोखड़ी तवा तापत ठेवा व् त्यावर हे भांडे ज़ाकन लावून 25 मिनिटे ठेवा .केक प्रमाणे हे बेक करावे लागते .गॅस मंद असावा
  7. 25 मिनिट नंतर तवसाळे छान खरपुस भाजुन तयार होईल .ही त्याची पाठची बाजू आहे
  8. आता ठंड ज़ाल्यावर ह्याच्या वडया करा आणि खावुक देवा:relaxed:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर