Photo of Paan Modak by Aarti Nijapkar at BetterButter
1113
1
0.0(0)
0

पान मोदक

Sep-16-2018
Aarti Nijapkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पान मोदक कृती बद्दल

पान मोदक पोटभरून जेवल्यावर मुखवास म्हणून खाऊ शकतो, मोदकाचा एक आगळावेगळा प्रयोग करून पाहिला.... मावा काजू ची पेस्ट करून त्यात मसाला पानाची भरड व इतर साहित्य वापरून हे पान मोदक बनविले आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मोदकाचे सारण / मिश्रण
  2. तूप १ लहान चमचा
  3. खवलेला नारळ १ वाटी
  4. गूळ २ मोठे चमचे
  5. मसाला / गोड पान २
  6. बदामाचे व काजूचे काप १ लहान चमचा
  7. मोदकाचे आवरण
  8. मावा १ वाटी  
  9. काजू पेस्ट  १/२ वाटी
  10. दुधाची पावडर १ मोठा चमचा
  11. रोझ एस्सेन्स / इमलशन १/२ लहान चमचा किंवा आवडीनुसार

सूचना

  1. मोदकाचे सारण करण्यासाठी
  2. मसाला / गोड पान त्यात चुना व सुपारी न घातलेलं घ्यावे मग ते पान मिक्सर च्या भांड्यात घालून जाडसर भरड/ वाटून घ्या व एक वाडग्यात काढून ठेवा
  3. आता कढई / पॅन तापवून त्यात तूप घालून बदाम व काजूचे काप परतवून घ्या मग खवलेला नारळ परतवून घ्या 
  4. गूळ घालून मिश्रण मंद आचेवर एकत्र करून घ्या गूळ वितळले की त्यात पानाची भरड घालून मिश्रण एकजीव करून घ्या गॅस बंद करून सारण गार करत ठेवा
  5. मोदकाचे आवरण
  6. कढईत मंद आचेवर मावा व काजूची पेस्ट  ४ ते ५ मिनिटे परतवून घ्यावी मग गॅस बंद करून त्यात दूधाची पावडर व रोझ एस्सेन्स / एमलशन घालून मिश्रण छानसं एकजीव करून घ्यावे
  7. दोन्ही आवरण आणि सारण गार झाले की, माव्याचे छोटे गोळे करून हाताच्या बोटांनी थोडे पसरवून (लहान पोळी करून) त्यात मधोमध सारण भरून पाऱ्या करून मोदक वळून घ्यावे किंवा मोदकाच्या साच्यात हे मोदक केले की उत्तम आकार येतो शिवाय दिसायला खूप सुरेख दिसतात.
  8. अश्याप्रकारे पान मोदक तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर