मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरणाचे समोसे

Photo of Purnache Samose by Aarti Nijapkar at BetterButter
713
0
0.0(0)
0

पुरणाचे समोसे

Sep-16-2018
Aarti Nijapkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणाचे समोसे कृती बद्दल

पुरणाचे समोसे चण्याच्या डाळीचे पुरण करून मग मैदा किंवा गव्हाच्या पिठाचे आवरण करून समोसे करून तेलात तळून घ्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चण्याची डाळ १ वाटी
  2. गूळ १ वाटी
  3. सुंठ पावडर १/४ लहान चमचा
  4. तूप १ मोठा चमचा
  5. काजू कापलेले १ लहान चमचा
  6. बदाम कापलेले १ लहान चमचा
  7. चारोळी १ लहान चमचा
  8. आवरण
  9. मैदा १ वाटी
  10. तेल (मोहन) १ चमचा
  11. खाण्याचा सोडा चिमूटभर
  12. मीठ किंचित
  13. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. एक भांड्यात चण्याची डाळ आवश्यकतेनुसार पाणी घालून चण्याची डाळ शिजवून घ्यावी चण्याची डाळ शिजली की त्यातलं पाणी सुकवून  टाका
  2. उरलेलं पाणी सुकले की गॅस मंद करून त्यात किसलेलं किंवा कापलेले गूळ व सुंठ पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  3. मिश्रण सतत परतावेत जेणेकरून मिश्रण एकत्र होईल व सुटलेलं पाणी सुकून जाईल
  4. गूळ व चण्याची डाळ एकजीव झाले की गॅस बंद करून पुरण थोडे कोमट करून पुरण यंत्र किंवा पाट्यावर वाटून घ्या
  5. मिक्सर मध्ये वाटत असाल तर पुरण गार करून घ्यावे
  6. आता एका भांड्यात किंवा पॅन मध्ये तूप गरम करून त्यात कापलेले काजू , बदाम ,चारोळी परतवून घ्या मग त्यात वाटलेले पुरण घालून एकजीव करून घ्या व गॅस करून घ्या
  7. मैदा मीठ एकत्र करून घ्या तेलाचे मोहन घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  8. मैद्यात खाण्याचा सोडा मिसळून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे पीठ मऊसर असावेत (सैल करू नये)
  9. समोसेची पट्टी बनवून घ्या
  10. अर्धचंद्रकार पिटाचे गोळे लाटून त्यात मध्यभागी कापून घ्या अश्याप्रकारे सर्व पट्ट्या तयार करून घ्या
  11. आता पट्टी घेऊन बाजूने पाणी लावून त्याचा कोन करून घ्या बाजूंनी दाबून घ्या
  12. मग त्यात चमच्याने पुरण भरून घ्यावे
  13. वरचा भाग थोडासा दुमडून पूर्ण कोण त्रिकोणी करून घ्या
  14. बंद केलेली बाजू व्यवस्थित दाबून घ्या म्हणजे तळताना सुटणार नाही
  15. सर्व समोसे भरून घ्या
  16. कढईत तेल कडकडीत तापवून घ्या
  17. मध्यम आचेवर समोस तळून घ्या
  18. सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे
  19. अश्याप्रकारे सर्व समोसे तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर