Photo of Rabri / Rabdi by Sanika SN at BetterButter
779
3
0.0(0)
0

रबडी

Sep-18-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रबडी कृती बद्दल

लच्छेदार रबडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • नॉर्थ इंडियन
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ लिटर दूध
  2. ४-५ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
  3. १ टेस्पून दूध मसाला ( ह्यात जायफळपूड, वेलचीपूड,थोडे केशर व सुक्या-मेव्याची पूड असते)
  4. सजावटीसाठी पिस्त्याचे काप
  5. चिमूट्भर केशर
  6. चांदीचा वर्ख (ऐच्छिक)

सूचना

  1. एका नॉन-स्टीक भांड्यात दूध मंद आचेवर गरम करायला ठेवावे. दूधाला उकळी येऊन वर साय जमा व्ह्यायला लागली की , चमच्याने सायीला भांड्याच्या कडेला लावत जावे.
  2. जेव्हा-जेव्हा साय दूधावर यायला लागेल तसे-तसे ती कडेला लावावी.
  3. आच मंदचं असावी नाहीतर साय करपेल.
  4. दूध बर्‍यापैकी आटले असे वाटले की कडेची साय हळू-हळू चमच्याने काढून दुधात मिसळावी.
  5. त्यात दूध-मसाला घालून अजुन थोडे आटवून घ्यावे.
  6. दूधाला दाटपणा आला की त्यात थोडी-थोडी करुन साखर मिक्स करुन घ्यावी.
  7. गॅस बंद करून रबडी पूर्ण गार होऊ द्यावी, गार झाल्यावर रबडी जरा घट्ट वाटेल.
  8. सर्व्हिंग बाऊलमध्ये रबडी घ्यावी व त्यावर पिस्त्याचे काप घालावे. चिमूटभर केशर व चांदीचा वर्ख लावून घ्यावे.
  9. ही रबडी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जिलेबी, मालपुव्याबरोबर सर्व्ह करु शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर