Photo of Ukadiche Modak. by Ashwini Thaore at BetterButter
459
0
0.0(1)
0

Ukadiche Modak.

Sep-25-2018
Ashwini Thaore
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. उकड बनवण्यासाठी
  2. १ वाटी (१५० ग्राम) बासमती तांदुळाचे पीठ
  3. १ वाटी पाणी
  4. चिमटीभर मीठ
  5. सारण बनवण्यासाठी
  6. १ वाटी ओल्या नारळाचा कीस
  7. पाव वाटी गुळ
  8. २ चमचे साखर
  9. १/२ छोटा चमचा वेलची पावडर
  10. ४-५ थेंब केशर अर्क

सूचना

  1. एका नॉनस्टिक भांड्यात सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य घ्यावे. सर्व एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवावे.
  2. अर्ध्या तासाने मध्यम आचेवर हे भांडे ठेऊन, गुळ वितळून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे.
  3. ४-५ मिनटात हे सारण तयार होईल. हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरण्यासाठी वापरावे
  4. एका पातेल्यात १ वाटी पाणी घेऊन, चिमुटभर मीठ घालून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावे.
  5. पाण्याला उकळी येताच, त्यात तांदुळाचे पीठ घालून, चांगले ढवळावे.
  6. हे भांडे आचेवरून उतरून, १० मिनटे झाकून ठेवावे.
  7. १० मिनिटांनी, मोठ्या परातीत ही उकड घेऊन, गरम असतानाच मळून घ्यावी. मळताना आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून, शेवटी थोडे तेल लावून मऊसर गोळा तयार करावा.
  8. मोदक करेपर्यंत हा गोळा झाकून ठेवावा. मोदकपात्रात लागेल तेवढे पाणी घेऊन ते गरम होण्यास ठेवावे.
  9. आता उकडीतून छोटा लिम्बाएवढा गोळा घेऊन, त्याची पारी तयार करावी नंतर साचा चा सायानि
  10. एक मोठा चमचा पुरण घालावे.
  11. ह्याच प्रमाणे सगळे मोदक करून घ्यावेत.
  12. आता केळीच्या पानाला थोडा तेलाचा हाथ लावून हे पान मोदकपात्रात ठेवावे.
  13. आता मोदकपत्राचे झाकण लावून, १५ मिनटे मोदक उकडून घावेत.
  14. गरम गरम साजूक तूप घालून खायला घ्यावेत.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ashwini Thaore
Sep-25-2018
Ashwini Thaore   Sep-25-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर