Photo of Aambe daal by Chayya Bari at BetterButter
525
4
0.0(0)
0

आंबे डाळ

Sep-30-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबे डाळ कृती बद्दल

चैत्रागौरीला प्रसादासाठी केली जाणारी ही पाककृती सवाष्णी ना कैरीच्या पन्ह्याबरोबर प्रसाद म्हणून दिली जाते उन्हाळ्यात गारवा देणारी ही पाककृती खरच चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 6 तास भिजवलेली हरबरा डाळ 2 वाट्या
  2. कैरीचा कीस 1 वाटी आंबट कैरी असेल तर 1/2 वाटी
  3. साखर 2 चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. जिरे,मोहरी,हिंग
  6. कोथिंबीर
  7. खोबरे कीस
  8. डाळिंबाचे दाणे 2 चमचे
  9. हळद 1 चमचा
  10. हिरवी मिरची कापून 2
  11. तेल 2 चमचे

सूचना

  1. प्रथम डाळ स्वच्छ धुवून मिक्सरवर बारीक करावी व कैरी किसून घ्यावी दोन्ही एकत्र करावे
  2. आता फोडणीपत्रत तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग,हिरवी मिरचीची फोडणी करावी गास बंद करावा फोडणीत हळद घालून मिक्स करावे व फोडणी कैरी. व डाळीच्या मिश्रणावर ओतावी मीठ साखर घालून मिक्स करावे
  3. नैवेद्य सज्वताना वर कोथिंबीर खोबरे कीस व डाळींबाचे दाणे घालावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर