प्रथम खोबरे बारीक किसून कोरडेच साधारण भाजणे. रवा थोड्या निम्म्या तुपावर सोनेरी रंगावर भाजून घ्यावा. खसखस उरलेल्या तुपावर भाजुन घेणे.साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. पिठी सागरही चालू शकते..खोबरे, साखर रवा, वेलची पूड जायफळ पूड आणि ड्रायफ्रुटस हे सर्व एकत्र करून चांगले मिसळावे. पारी साठी मैदा किंवा गहू पीठ एका बाऊल मध्ये घेऊन त्यात बारीक रवा चवीनुसार मीठ घालून तुपाचा मोहन घालावे व कणिक मळून दहा मिनिटे ठेवावे. नंतर पुरीएवढी एक पारी लाटून त्यावर एक ते दीड चमचा सारण ठेवून अर्धवर्तुळाकार होईल अशी घडी करून कोरणे वापरून योग्य आकारात कंरजी कोरून घ्यावी. अशा थोड्या करंज्यांचं झाल्यावर ते किंवा तूप चांगले गरम झाले कि त्यात तळून घ्यावेत.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा