मुख्यपृष्ठ / पाककृती / तट्टे इडली

Photo of Thatte Idli by Subha Prakash at BetterButter
3854
26
4.0(0)
0

तट्टे इडली

Aug-31-2015
Subha Prakash
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. इडलीचे तांदूळ - 2 वाट्या
  2. साधे तांदूळ - सवा वाटी
  3. उडीदडाळ - पाऊण वाटी
  4. पोहे - मुठभर
  5. सोडा - चिमूटभर

सूचना

  1. इडलीसाठी आपण ज्याप्रमाणे भिजवतो, त्याप्रमाणेच तांदूळ आणि उडीदडाळ भिजवा. नंतर पोहे घालून तांदूळ वाटून घ्या. नंतर उडीदडाळ वेगळी वाटा. तांदूळ आणि वाटलेली डाळ एकत्र करून नीट हलवा आणि मीठ घाला.
  2. कमीत कमी 10 तासासाठी आंबवायला ठेवा. शिजवण्याच्या अर्धा तास अगोदर त्यात सोडा घालून नीट मिसळा आणि नंतर उपयोगात घ्या. खर म्हणजे रेस्टॉरंटमध्ये सोड्याचा वापर अधिक करतात, त्यामुळे तट्टे इडली अतिशय मऊ असतात.
  3. कर्नाटकमध्ये तट्टे इडली बनाविण्यासाठी खास तट्टे इडली मोल्स वापरण्यात येतात. परंतु मी माझ्या घरी इडली अप्पमचे स्टॅन्ड वापरले होते. जर तुमच्याकडे वाड्याचे स्टॅन्ड असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. ज्यांच्याकडे दोन्ही नाही ते कडा असलेले ताट वापरू शकतात.
  4. परंतु माझ्या इडली अप्पम स्टॅन्डला कडा नाहीत. जर तुम्ही कडा असलेले ताट वापरले, तर ते अगदी मैसूर इडलीसारखे दिसतील. केळीचे पान कापा आणि ताटात ठेवा. त्याला तिळाचे तेल लावा आणि त्यावर मिश्रण घाला आणि वाफेवर ठेवा.
  5. नारळाची चटणी, सांबार, लाल चटणी, जर शक्य असेल, तर उडीदडाळ वड्यासह गरमगरम वाढा, ज्यामुळे म्हैसूरच्या हॉटेलमध्ये बसून खाल्यासारखे वाटेल......:-)

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर