मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजिटेबल फ्रॅन्की

Photo of Vegetable Frankie by Salma Godil at BetterButter
4245
900
4.4(1)
1

व्हेजिटेबल फ्रॅन्की

Sep-01-2015
Salma Godil
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोळीसाठी :- मैदा - 2 वाट्या
  2. मीठ - आवश्यकतेनुसार
  3. तेल - 2 लहान चमचे
  4. अर्धा कप पाणी
  5. अंडे - 1 (मीठ घालून फेटलेले)
  6. कटलेटसाठी :- बटाटे - 4 (उकडलेले)
  7. भोपळा मिरची - अर्धी (चिरलेली)
  8. हिरवे वाटाणे - 1/4 वाटी (शिजवलेले)
  9. मक्याचे दाणे - अर्धी वाटी (शिजवलेले)
  10. गाजर - अर्धी वाटी (चिरलेले)
  11. आले-लसणाची पेस्ट - अर्धा लहान चमचा
  12. हिरव्या मिरच्यांची पेस्ट - अर्धा लहान चमचा
  13. गरम मसाला - अर्धा लहान चमचा
  14. जिरेपूड - 1/4 लहान चमचा
  15. चाट मसाला - 1 लहान चमचा
  16. मीठ - स्वादानुसार
  17. कोथिंबीर - थोडी
  18. लिंबाचा रस - 2 लहान चमचे
  19. कॉर्नफ्लोर - 2 लहान चमचे
  20. तेल - परतण्यासाठी
  21. बनविण्यासाठी :- 2 बारीक चिरलेले कांदे
  22. कोथिंबीर - अर्धा वाडगा (बारीक चिरलेली)
  23. चिंचेचा गर - अर्धा वाडगा
  24. चाट मसाला - अर्धा वाडगा
  25. चीज - 2 क्युब्स (किसलेले)

सूचना

  1. पोळी बनविण्यासाठी:- यासाठी सांगितलेले सर्व घटक एकत्र करा आणि मऊ कणिक मळा. पातळ पोळी लाटा आणि तव्यावर अतिशय कमी प्रमाणात भाजा. पोळीच्या एका बाजूला फेटलेले अंडे लावा आणि अंडे शिजेपर्यंत तळा. नंतर त्याला बाजूला व्यवस्थित झाकून ठेवा.
  2. कटलेटसाठी:- बटाटे आणि वाटाणे कुस्करा, त्यात मक्याच्या दाणे, गाजर आणि भोपळा मिरची कुस्करून घाला.
  3. आता यात उरलेले घटक सुद्धा मिसळा आणि लांब आकाराचे कटलेट बनवा. त्यांना थोड्या तेलावर परता आणि बाजूला ठेवा.
  4. बनविण्यासाठी :- अंडे लावलेली पोळी घ्या आणि मध्यभागी कटलेट ठेवा.
  5. नंतर यावर चिंचेचा गर, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला आणि चीज घाला. त्याला घट्ट गुंडाळा. एक टूथपीक लावा किंवा सिल्वर फॉईलमध्ये गुंडाळा.
  6. हिरव्या चटणीबरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Gauri Kulkarni
Jun-14-2018
Gauri Kulkarni   Jun-14-2018

Nice

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर