मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट एग फ्राईड राईस

Photo of Instant Egg Fried Rice by Priya Mani at BetterButter
6905
134
4.8(0)
3

झटपट एग फ्राईड राईस

Oct-14-2016
Priya Mani
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट एग फ्राईड राईस कृती बद्दल

मीठ,मिरी व सोया सॉस घालून परतलेल्या भातात उकडलेली अंडी घालावीत.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. बासमती तांदुळ - 2 कप
  2. गाजर, बीन्स, मटार, सिमला मिरची, कोबी - 1 1/2 कप
  3. पातीचा कांदा 2 पाती
  4. 3 ते 4 अंडी ( चांगली फेटलेली )
  5. चवीनुसार मीठ व पांढरी मिरी
  6. चवीनुसार सोया सॉस
  7. साखर 1 टी स्पून
  8. अजिनोमोटो ( ऐच्छिक ) 1/2 टी स्पून
  9. चवीनुसार चिली सॉस ( ऐच्छिक )
  10. साली काढलेल्या 2 लसूण पाकळ्या
  11. तेल 1 टी स्पून

सूचना

  1. तांदुळ शिजवून घ्यावा आणि थंड होऊ द्यावा . शिल्लक राहिलेला भात वापरणे चांगले.
  2. कढई किंवा पॅनमध्ये तेल टाकावे.
  3. चिरलेले आल्ले टाकून उच्च आचेवर परतून घ्यावे, त्यात पातीचा कांदा घालावा आणि छानपैकी परतून घ्यावा.
  4. सर्व भाज्या घालून उच्च आचेवर चटकन परतावे, मीठ व मिरी घालून चांगले मिसळून घ्यावे.
  5. आता सर्व भाज्या एका बाजूला कराव्यात, फेटलेली अंडी घालून शक्य तितकी नीट मिसळून घ्यावीत, नंतर त्यात भाज्या घालून चांगले मिसळून घ्यावे.
  6. आता भात घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.
  7. सोया सॉस व साखर घालून भाताला स्वादिष्ट बनवावे.
  8. प्रथम अजिनोमोटो व चिली सॉस घालावे, सगळे उच्च आचेवर परतावे.
  9. मिसळताना भाताचे तुकडे होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी.
  10. शेवटी पातीच्या कांद्याची पात घालावी आणि ते सगळे वाढण्याच्या बाऊलमध्ये घ्यावे .
  11. आणखी थोड्या पातीच्या कांद्याने सजवावे आणि कोणत्याही चायनीज मंच्युरीयन ग्रेव्ही बरोबर खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर