मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या डाळीची खस्ता कचोरी

Photo of Moong daal ki khasta kachori by Anjana Chaturvedi at BetterButter
3943
851
4.4(0)
0

मुगाच्या डाळीची खस्ता कचोरी

Sep-26-2015
Anjana Chaturvedi
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • डिनर पार्टी
  • युपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 8

  1. मुगाची डाळ - 3/4 वाटी
  2. स्वयंपाकाचे तेल - 2 मोठे चमचे
  3. चिरलेल्या हिरव्या मिरच्या - दीड चमचा
  4. चिरलेली पुदिन्याची पाने - 2 मोठे चमचे
  5. चिरलेली कोथिंबीर - 2 मोठे चमचे
  6. बडीशेप - अडीच लहान चमचे
  7. धणेपूड - 2 लहान चमचे
  8. जिरे - 1 लहान चमचा
  9. हिंग - अर्धा लहान चमचा
  10. लाल तिखट - अडीच लहान चमचे
  11. गरम मसाला - 1 लहान चमचा
  12. कैरीचा पावडर - 2 लहान चमचे
  13. किसलेल आले - 2 लहान चमचे
  14. पीठ मळण्यासाठी -
  15. मैदा - 350 ग्रॅम्स
  16. स्वयंपाकाचे तेल - अर्धा कप
  17. बेकिंग सोडा - 1/4 लहान चमचा
  18. लिंबाचा रस - अर्धा लहान चमचा
  19. मीठ - 1 लहान चमचा

सूचना

  1. मुगाची डाळ धुवा आणि 1 तास भिजवून ठेवा. जाड तळाच्या एका भांड्यात तेल गरम करा, त्यात बडीशेप, जिरे, हिंग, धणे, चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
  2. मुगाच्या डाळीचे सर्व पाणी काढून टाका. एका कढईत घालून परता. त्यात एक कप पाणी आणि मीठ घाला. मंद आचेवर झाकून शिजवा.
  3. उरलेले मसाले देखील घाला आणि थोडेसे कुस्करा. चिरलेला पुदिना, कोथिंबीर घालून आचेवरून उतरावा.
  4. एक मोठ्या वाडग्यात मैदा, बेकिंग सोडा, मीठ घ्या आणि एकजीव करा. तेल, लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिसळा.
  5. एक मऊ कणिक तयार करा आणि 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. एकसमान आकाराचे गोळे करा. त्यात सारख्या भागात डाळीचे मिश्रण भरा आणि सर्व बाजूंनी बंद करा.
  6. कोरडे पीठ शिंपडून त्यावर गोळा ठेऊन थोडेसे मध्यम जाडसर कचोरी लाटा. आणि मध्यम आचेवर तळा.
  7. दोन्ही बाजूंना खुसखुशीत आणि सोनेरी रंगाची होईपर्यंत तळा. अतिरिक्त तेल काढण्यासाठी एका पेपर नॅपकीनवर ठेवा. आणि गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर