मुख्यपृष्ठ / पाककृती / आवळा कॅन्डी

Photo of Amla candy by Kamal Thakkar at BetterButter
3986
7
5.0(1)
0

आवळा कॅन्डी

Jan-05-2017
Kamal Thakkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आवळा कॅन्डी कृती बद्दल

आवळ्यात विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यांना उन्हात वाळविले जाते आणि ते येताजाता खाऊ शकतो.

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. आवळे - 1 किलो
  2. साखर (खडी साखर किंवा मिश्री वापरू शकतात. ही आरोग्यासाठी चांगली असते) - 700 ग्रॅम्स

सूचना

  1. पाण्यात आवळे कच्चे पक्के शिजवा.
  2. आवळ्यातून पाणी आणि बिया काढून टाका.
  3. थंड झाल्यावर त्यात साखर घाला. जर खडी साखर घेतली तर त्याला बारीक वाटून टाका.
  4. आता त्याला कमीत कमी 3 दिवस तसेच ठेवा. साखर आणि आवळे एकजीव होऊन हळूहळू रस तयार होईल. साखरेचा गोडवा हळूहळू आवळ्यांमध्ये शोषला जाईल.
  5. एक किंवा दोन दिवसात त्याला हळुवारपणे हलवा म्हणजे आवळे पूर्णपणे रसात मिसळतील.
  6. 3 दिवसांनतर आवळे एका चाळणीत ठेवून गाळून घ्या ज्यामुळे आवळ्यापासून राहिलेला रस वेगळा होईल.
  7. हा रस वेगळा केल्यावर आवळा शरबत बनविताना वापरू शकतात.
  8. एका मोठ्या ताटात आवळे ठेऊन उन्हात कमीत कमी 2 ते 3 दिवस वाळवू शकता. जेव्हा ते कुरकुरीत होतील तेव्हा बाटलीत भरा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Asharani Desai
Jun-24-2018
Asharani Desai   Jun-24-2018

छान मला हि माहिती पाहिजे होतीच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर