मुख्यपृष्ठ / पाककृती / एगलेस व्हॅनिला टी केक

Photo of Egg less Vanilla Tea Cake by Namita Tiwari at BetterButter
9195
501
4.4(0)
4

एगलेस व्हॅनिला टी केक

Jul-15-2015
Namita Tiwari
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • किड्स रेसिपीज
  • युरोपिअन
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 आणि 1/3 वाट्या साधे पीठ
  2. 3/4-1 वाटी पिठी साखर (तुमच्या आवडीनुसार)
  3. 1 कप घट्ट दही
  4. दीड लहान चमचा बेकिंग पावडर
  5. अर्धा लहान चमचा बेकिंग सोडा
  6. 1/3 कप तेल
  7. 1 लहान चमचा व्हॅनिला इसेन्स
  8. तुमच्या आवडीचे भाजलेले आणि चिरलेले मुठभर नट्स

सूचना

  1. ओव्हन 200 अंच सेल्सियस तापमानावर प्रीहीट करा. 6 इंचाच्या गोल केकच्या भांड्याला तेल लावा आणि त्यावर मैदा डस्ट करा.
  2. एका वाडग्यात दही मऊ होईपर्यंत फेटा. नंतर त्यात बेकिंग पावडर आणि सोडा घाला. या मिश्रण फसफसण्यासाठी 3 मिनिटे बाजूला ठेवा.
  3. तेल, साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून एकजीव होईपर्यंत हलवा. थोडा थोडा मैदा घाला. केवळ मिसळण्यापुरते हलवा.
  4. तयार केलेल्या केकच्या भांड्यात मिश्रण घाला. चमच्याने सारखे करून त्यावर कापलेले सुके मेवे पसरवा.
  5. 200 अंश सेल्सियस तापमानावर 10 मिनिटे भाजा. तापमान कमी करून 175 अंश सेल्सियस करा आणि पुन्हा 40 मिनिटे किंवा टूथपिक स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत भाजा.
  6. भांड्यातच केकला 10 मिनिटे थंड होऊ द्या. चाकूने कडा मोकळ्या करत केक भांड्यातून काढा.
  7. रॅकवर थंड करा. दुसऱ्या दिवशी काप करून वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर