Photo of Sambhar by Manisha Goyal at BetterButter
4472
234
4.8(0)
0

सांबार

Oct-12-2015
Manisha Goyal
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांबार कृती बद्दल

सांबार हे मूलतः डाळ प्रकारातील असून ते पाण्यात शिजवले जाते आणि भारतात सर्वत्र बनविले जाते. हे माझ्या आवडीचे आहे आणि ते जर माझ्या ममाने बनविलेले असेल तर ते मी दिवसभर खावू शकतो. हे ज्यावेळी अतिशय गरम असते तेव्हा त्याची चव सगळ्यात चांगली असते , हे अगोदर करून ठेवावे , चविष्ट सांबार बनविण्याचे हे गुपित आहे. ही सांबार बनविण्याची सगळ्यात चांगली पद्धत आहे, मस्त स्वाद व चवीने समृद्ध आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • तामिळ नाडू
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तूरडाळ ( 30 मिनिटे भिजवलेली ) - 1 कप
  2. चिरलेल्या मिश्र भाज्या - 1 कप
  3. ताजा चिंचेचा लगदा - 1 टेबल स्पून
  4. हळद पावडर - 1/2 टी स्पून
  5. चवीनुसार मीठ
  6. पाणी - 2.5 कप
  7. फोडणीसाठी : 3 टेबल स्पून तेल
  8. 3 - सुक्या लाल मिरच्या
  9. 1 टी स्पून - मोहरी
  10. 1 टी स्पून - एव्हरेस्ट हिंग
  11. 12 ते 15 कढीपत्ता
  12. 1 टी स्पून किसलेले आल्ले
  13. 1 कप - चिरलेले टोमॅटो
  14. 1 कप - चिरलेला कांदा
  15. 1 टी स्पून लाल मिरची पावडर
  16. 1 1/2 टेबल स्पून - सांबार मसाला
  17. बारीक खवलेले नारळाचे खोबरे ( ऐच्छिक )

सूचना

  1. डाळ 30 मिनिटे भिजवून ठेवावी आणि स्वच्छ धुवून घ्यावी.
  2. प्रेशर कुकरमध्ये डाळ, चिरलेल्या भाज्या, मीठ, हळद पावडर व पाणी घालून मंद आचेवर 5-6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.
  3. आता कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, सुक्या लाल मिरच्या, हिंग व कढीपत्ता घालावा .
  4. कांदा व आल्ले घालून तांबूस होईपर्यंत परतावे. त्यामध्ये टोमॅटो घालावेत. ते मऊ होईपर्यंत शिजवावेत . प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या डाळीत मिसळून घ्यावे.
  5. सांबार मसाला, मिरची पावडर, चिंचेचा पल्प घालून चांगले ढवळावे.
  6. आवश्यक घट्टपणा येईल इतपत पाणी घालावे. 10 मिनिटे शिजवावे, चांगले ढवळून घ्यावे . खवलेले नारळाचे खोबरे घालावे.
  7. वाफाळत्या राईस, इडली किंवा डोसा बरोबर गरमागरम खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर