मुख्यपृष्ठ / पाककृती / नो-बेक एग पुडिंग

Photo of No-Bake Egg Pudding by Lubna Karim at BetterButter
2459
199
4.8(0)
0

नो-बेक एग पुडिंग

Oct-12-2015
Lubna Karim
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 - अंडी
  2. 1 लिटर - दूध
  3. 3/4 वाटी - साखर
  4. 2 मोठे चमचे - तूप/वितळविलेले लोणी
  5. अर्धा मोठा चमचा - वेलदोड्याची पूड
  6. थोड्या केशरच्या काड्या
  7. 10 काजूचे तुकडे

सूचना

  1. दूध गरम करा आणि मंद आचेवर दोन तृतीयांश इतके कमी होईपर्यंत उकळवा. आता गॅस बंद करा. सामान्य तापमानावर थंड होण्यासाठी ठेवा.
  2. 1 मोठ्या चमचा दुधात केशर भिजत घाला.
  3. एक जाड तळाच्या भांड्यात अंडी आणि तूप एकत्र करून फेटा.
  4. कमी आचेवर या मिश्रणाला त्यातील पाणी वेगळे होईपर्यंत शिजवा. या मिश्रणात साखर आणि वेलदोड्याची पूड घालून शिजवा आणि अधूनमधून हलवत रहा.
  5. पाणी सुकेपर्यंत किंवा पाककृतीमध्ये पाणी मुरेपर्यंत शिजवा आणि एका लाकडी उलथन्याने कडेला आणि तळाशी लागलेले खरडून काढा.
  6. जेव्हा पुडिंग चमच्याला चिकटायला लागेल आणि चमकदार आणि चिकट बनेल, तेव्हा गॅस बंद करा.
  7. एका पॅनमध्ये तूप घ्या आणि काजूचे तुकडे बदामी रंगाचे होईपर्यंत तळा. हे तळलेले काजू पुडिंगवर घाला आणि कोमट वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर