मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला डोसा

Photo of MASALA dosa by Dipika Ranapara at BetterButter
5992
32
5.0(0)
0

मसाला डोसा

Jun-23-2017
Dipika Ranapara
480 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला डोसा कृती बद्दल

मसाला डोसा ही पारंपरिक दक्षिण भारतीय डीश आहे. बॅटर बनविण्यासाठी तांदुळ व उडीद डाळ वापरावी,मसाल्यामध्ये कांदा, बटाटा, मटार सोबत मसाला .... सांबार बरोबर जबरदस्त चविष्ट.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 10

  1. डोसा बॅटरसाठी :
  2. चवीनुसार मीठ
  3. 3 कप तांदुळ
  4. 1 कप उडीद डाळ
  5. 1 कप भिजवलेले पोहे
  6. 1 टी स्पून एरंडेल तेल
  7. 1 टी स्पून मेथीचे दाणे
  8. 3 हिरव्या मिरच्या
  9. 1/2 से मी आल्ले
  10. 1/2 कांदा
  11. मसाल्यासाठी :
  12. 5 उकडून साली काढलेले आणि चिरलेले बटाटे
  13. 5 स्लाईस केलेले कांदे
  14. एक बाऊल मटार
  15. 4-5 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  16. 1 टी स्पून किसलेले आल्ले
  17. 8-10 कढीपत्ता
  18. हिंग
  19. 2 टेबल स्पून तेल
  20. चवीनुसार मीठ
  21. 1/2 टी स्पून हळद
  22. 1 1/2 टी स्पून गरम मसाला
  23. 1/2 कप लिंबाचा रस
  24. 1/2 टी स्पून साखर
  25. 1/8 टी स्पून चाट मसाला

सूचना

  1. उडीद डाळ व मेथीचे दाणे घेऊन 4 तास भिजवावे, त्यानंतर ते दळून त्याची मऊसर पेस्ट बनवावी.
  2. तांदुळ 3-4 वेळा धुवून घ्यावा आणि 4 तास भिजवावा.
  3. तांदळाच्या मिक्सरच्या भांड्यात कांदा , मिरची, आल्ले, पोहे आणि पाणी घालून दळावे आणि त्याची मऊसर पेस्ट बनवावी.
  4. पोहे
  5. कांदा
  6. मिरची व आल्ले
  7. त्यात एरंडेल तेल व थोडासा लिंबाचा रस घालून मिसळून घ्यावे. आता बॅटर तयार झाले.
  8. कढईत तेल घेऊन गरम करावे, त्यात मोहरीचे दाणे टाकावेत.
  9. त्यामध्ये कढीपत्ता, मिरची , आल्ले घालून परतावे.
  10. मटार घालून परतावे.
  11. कांदा घालून परतावे .
  12. मीठ व हळद घालून शिजवावे.
  13. झाकण लावून काही मिनिटे शिजवावे .
  14. झाकण काढून चांगले मिसळून घ्यावे.
  15. बटाटे घालून चांगले मिसळून घ्यावे, थोडे मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस , साखर घालून 3 मिनिटे शिजवावे.
  16. मसाला तयार झाला.
  17. डोसा तव्यावर डोसा बॅटर ओतावे आणि डोसा पसरल्यावर थोडी लाल मिरची व आल्ले पेस्ट घालावी.
  18. मसाला टाकून मग तेल घालावे. डोसा दोन्ही बाजूने मसाल्यात पलटून घ्यावा.
  19. तयार
  20. सांबार सोबत खायला द्यावे.
  21. स्वादिष्ट आणि चवदार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर