मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली फ्राय

Photo of Idli fry by shridevi thirumalesh at BetterButter
2116
61
4.9(0)
0

इडली फ्राय

Nov-23-2015
shridevi thirumalesh
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली फ्राय कृती बद्दल

तुमच्या घरी इडली उरली असेल तर, तुम्ही एका चायनीज प्रकाराने फ्राय किंवा तळू करू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • चायनीज
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. इडल्या 3-4 नग
  2. भोपळा मिरची (लहान) -1 नग
  3. कांदा - 1 नग
  4. टोमॅटो - 1 नग
  5. गाजर - 1 नग
  6. तीळ - 1 चमचा
  7. स्वादानुसार लाल तिखट
  8. धणेपूड - 1/2 चमचा
  9. जिरेपूड - 1/2 चमचा
  10. सोया सॉस : 2 चमचे
  11. टोमेटो सॉस : 3-4 चमचे
  12. आले : लहान तुकडा (इच्छेनुसार)
  13. लसूण : 5-6 पाकळ्या
  14. शेपूची पाने आणि कोथिंबीर (इच्छेनुसार)
  15. मीठ स्वादानुसार
  16. खाद्य तेल

सूचना

  1. इडलीचे लहान तुकडे करून बाजूला ठेवा.
  2. कांदा, भोपळी मिरची, टोमॅटो, हिरवी पाने चिरा.
  3. गाजर किसा आणि आले व लसूण बारीक चिरा.
  4. एका कढईत तेल गरम करा त्यात तीळ घालून तडतडेपर्यंत परता (1 किंवा 2 सेकंद तळा). आच मध्यम ठेवा.
  5. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण घाला. उग्र वास जाईपर्यंत परता.
  6. कांदा गुलाबी होईपर्यंत परता, भोपळी मिरची घालून 10 सेकंद तळा.
  7. चिरलेली हिरवी पाने, किसलेले गाजर आणि टोमॅटो घालून चांगले परता.
  8. लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड घालून एकजीव करा.
  9. सॉस घालून परता. मीठ घालून मिसळा.
  10. आता इडलीचे तुकडे घाला आणि मिसळा.
  11. कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर