मुख्यपृष्ठ / पाककृती / राजस्थानी बेसन भिंडी

Photo of Rajasthani Besan Bhindi by Poonam Bachhav at BetterButter
33047
310
4.7(0)
5

राजस्थानी बेसन भिंडी

Nov-26-2015
Poonam Bachhav
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • सौटेइंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्रॅम्स भेंड्या
  2. 1/4 वाटी बेसन
  3. 2 मध्यम कांदे (चिरलेले)
  4. 1/2 लहान चमचा जिरे
  5. 1/2 लहान चमचा गरम मसाला
  6. 1/4 लहान चमचा हळद
  7. 1 लहान चमचा धणेपूड
  8. 1 लहान चमचा लाल तिखट
  9. अर्धा लहान चमचा बडीशेप
  10. अर्धा लहान चमचा आमचूर पावडर
  11. 1/4 लहान चमचा हिंग
  12. 3 लहान चमचे तूप
  13. 1-2 लहान चमचे पाणी (शिडकाव करण्यासाठी)
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. भेंडी स्वच्छ करून एका किचन टॉवेलने कोरड्या करा. जर भेंडी ओली राहिली, तर करी चिकट होईल. त्यांच्या लांबीनुसार अर्ध्यापर्यंत काप द्या.
  2. एका नॉनस्टीक पॅनमध्ये तूप घालून गरम करा. त्यात जिरे तडतडवा. नंतर त्यात हिंग आणि कांदा घाला. कांदा परतला की त्यात भेंडी घाला. नीट मिसळा आणि 2-3 मिनिटे शिजू द्या.
  3. मीठ आणि हळद घाला. मिसळा आणि 5-7 मिनिटे शिजू द्या. कुरकूरीत होण्यासाठी मध्यम आचेवर ठेऊन अधून मधून हलवत रहा.
  4. तेल सुटले की त्यात बेसन, जिर, धणेपूड, बडीशेप पावडर, लाल तिखट आणि आमचूर पावडर घाला. सर्व साहित्य नीट मिसळा.
  5. पॅनवर झाकण ठेऊन भेंडी 3-4 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. 3-4 मिनिटानंतर झाकण काढा आणि भेंडीवर थोडे पाणी शिंपडा, ज्यामुळे पॅनला ती चिकटणार नाही. पुन्हा मिसळा आणि 1 मिनिटाने गॅस बंद करा.
  6. गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर