Photo of Rice Idlis by Bindiya Sharma at BetterButter
3162
485
4.7(0)
0

राईस इडली

Dec-04-2015
Bindiya Sharma
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  •  केरळ
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड वाटी तांदूळ
  2. अर्धी वाटी उडीदडाळ
  3. 1 लहान चमचा मेथी
  4. जाड पोहे - 1/4 वाटी
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. डाळ, तांदूळ आणि मेथीला वेगवेगळे रात्रभर भिजत घाला.
  2. पोहे एक तास अगोदर भिजवा.
  3. दुसऱ्या दिवशी वाटून घ्या. अगोदर मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून मेथी वाटून घ्या. पोहे घालून पुन्हा वाटा.
  4. आता डाळीला गाळा आणि अर्धा कप पाणी घालून धुवा आणि वाटा (आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला).
  5. यानंतर मिश्रण थोडे फुललेले दिसेल, तेव्हा यात भिजवलेले तांदूळ आणि थोडे पाणी घालून वाटा. हे मिश्रण थोडे घट्ट झाले पाहिजे.
  6. आता मिश्रणाला अॅल्युमिनियमच्या एखाद्या भांड्यात काढा. त्यात मीठ घाला.
  7. याला आंबवण्यासाठी 7-8 तास झाकून ठेवा.
  8. इडलीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाल्यावर, इडलीच्या साच्याला थोडे तूप लावा आणि मोठ्या चमच्याने साचा पूर्ण भरा.
  9. इडलीच्या भांड्यात पाणी उकळावा. त्यत इडलीचा साचा ठेवा आणि मोठ्या आचेवर 10 मिनिटे वाफेवर इडल्या होऊ द्या.
  10. नंतर आच बंद करून 5 मिनिटानंतरच इडल्या काढा.
  11. इडलीला सांबार आणि नारळाच्या चटणीबरोबर गरमग्रम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर