Photo of Rajma by Bindiya Sharma at BetterButter
5171
357
4.8(0)
0

राजमा

Jul-22-2015
Bindiya Sharma
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा कृती बद्दल

राजमा ही प्रथिनानी समृद्ध अशी प्रसिद्ध पंजाबी डीश आहे आणि ती सहसा गरमागरम भाताबरोबर खाण्याचा आनंद घेतला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 150 ग्रॅम राजमा किंवा सोयाबीन
  2. चवीनुसार मीठ
  3. 1/4 टी स्पून हळद पावडर
  4. 1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
  5. 4-5 लसणाच्या पाकळ्या
  6. 1 मध्यम आकाराचा कांदा
  7. 3 मध्यम आकाराचे टोमॅटो
  8. आल्ल्याचा 1 इंच तुकडा
  9. 2 हिरव्या मिरच्या
  10. 1/2 टी स्पून जीरे
  11. 1 टी स्पून धणे पावडर
  12. 1/4 टी स्पून गरम मसाला
  13. 1 टेबल स्पून चिरलेली कोथिंबीर
  14. 2 टेबल स्पून तूप

सूचना

  1. 1 कप पाण्यात राजमा 8-9 तास ( रात्रभर ) भिजत ठेवावा . स्वच्छ धुवून 1/2 टी स्पून मीठ व 2 कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये घालावे. एक शिट्टी झाल्यावर आंच मंद करावी आणि 10-12 मिनिटे शिजवावे. बर्नर बंद करावा. 10 मिनिटांनी कुकर उघडून राजमा मऊ झालाय किंवा नाही ते पहावे, नसेल तर आणखी 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.
  2. मसाला बनविण्यासाठी कांदा, हिरवी मिरची, लसूण व आल्ले दळून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. पॅनमध्ये तेल गरम केल्यावर त्यात जीरे व कांद्याची पेस्ट घालावी. सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळावे.
  3. त्याच पॅनमध्ये दळलेले टोमॅटो घालावेत आणि ढवळावे, त्यात मीठ , हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालावा.
  4. आता त्यामध्ये मसाल्यासोबत उकडलेला राजमा मिसळून घ्यावा . 5-8 मिनिटे मंद आचेवर शिजवावे. कोथिंबीरीने सजवून खायला द्यावा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर