Photo of Vege Appey by Soniya Singh at BetterButter
5448
149
4.7(0)
0

वेज आप्पे

Jan-10-2016
Soniya Singh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • किटी पार्टी
  • एव्हरी डे
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • स्नॅक्स
  • मेन डिश
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री
  • लो कोलेस्टेरॉल
  • लो कार्ब
  • डायबेटिक
  • लो कॅलरी
  • हाय फायबर
  • लो फॅट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मिश्रण बनविण्यासाठी:
  2. 2 वाट्या रवा
  3. 1 कप दही
  4. 1 मोठा चमचा मीठ
  5. 1 कप पाणी
  6. 1 मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर
  7. सारणासाठी:
  8. 1 वाटी अगदी बारीक चिरलेल्या भाज्या (भोपळा मिरची, कोबी, कांदा, टोमॅटो बिया काढलेला)
  9. 1 लहान चमचा चिरलेली हिरवी मिरची
  10. 1 लहान चमचा मीठ
  11. 1/4 लहान चमचा लाल तिखट
  12. लावण्यासाठी तेल

सूचना

  1. मिश्रणाचे सारे घटक एकत्र करा आणि 30 मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ राहू द्या
  2. आता त्यात इनो घाला आणि नीट हलवा. आता आप्प्याच्या भांड्याला तेल लावा.
  3. सारणाचे सर्व घटक एकत्र करा. 1-1 लहान चमचा मिश्रण आप्प्याच्या भांड्यात भरा नंतर 1-1 लहान चमचे सारण भरा.
  4. सारण अलगद दाबा आणि पुन्हा 2-2 लहान चमचे मिश्रण सारणावर घाला.
  5. आता आप्प्याचे भांडे 2 मिनिटांसाठी झाकून ठेवा किंवा आप्पे खालून गुलाबी रंगाचे होईपर्यंत शिजवा. नंतर त्यांना पलटवा. 1 मिनिटासाठी दुसऱ्या बाजूला शिजवा.
  6. एकदा दोन्ही बाजू शिजल्या आणि कुरकुरीत झाल्या की त्यांना आप्प्याच्या भांड्यातून काढून घ्या.
  7. ओल्या खोबऱ्याच्या चटणी/कोथिंबीर पुदिन्याची चटणी किंवा सांबारबरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर