मुख्यपृष्ठ / पाककृती / मुलीगटावनी सूप

Photo of Mulligatawny Soup by Rathy V at BetterButter
3256
16
0.0(0)
0

मुलीगटावनी सूप

Jan-12-2016
Rathy V
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • श्री लंकन
  • व्हेज
  • सोपी
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मसुर डाळ - 100 ग्रॅम
  2. तेल - 2 टेबल स्पून
  3. मोठे कांदे - 2 स्लाईस केलेले
  4. नारळाचा किस - 100 ग्रॅम
  5. 1 हिरवे सफरचंद - स्लाईस केलेले ( बिया काढून टाकाव्यात )
  6. जीरे - 20 ग्रॅम
  7. जीरे पावडर - 15 ग्रॅम
  8. काळ्या मिरीचे दाणे - 20 ग्रॅम
  9. लसूण - 10 पाकळ्या
  10. हळद पावडर - 1/2 टी स्पून
  11. मिरची पावडर - 1 टी स्पून
  12. साखर - अंदाजे 15 ग्रॅम
  13. मीठ जरूरीप्रमाणे
  14. चिरलेल्या कोथिंबीरीच्या काड्या - 1 मुठभर
  15. कढीपत्ता - 1 मुठभर
  16. हिरव्या मिरच्या - 2 स्लाईस केलेल्या
  17. दूध - 100 मिली
  18. करी पावडर - 1 टी स्पून
  19. 1 लिंबाचा रस
  20. सजविण्यासाठी भात

सूचना

  1. प्रेशर कुकरमध्ये 1 लि. पाण्यात मसुर डाळ चांगली मऊ होईपर्यंत ( 5-6 शिट्ट्या ) शिजवावी. बाजूला ठेवावी .
  2. खोल,जड पॅन गरम करावा. त्यात 2 टेबल स्पून तेल घालून स्लाईस केलेला कांदा टाकावा आणि सोनेरी तांबूस होईपर्यंत तळावा . नारळाचा किस घालावा आणि मिनिटभर तळावे .
  3. स्लाईस केलेले हिरवे सफरचंद घालून दोन मिनिटे तळावे . जीरे व मिरीचे दाणे घालून चांगले परतून घ्यावे. लसणाच्या पाकळ्या टाकून चांगले परतावे.
  4. पाण्यासकट शिजलेली मसुर डाळ घालावी आणि मिसळून घ्यावी. हळद पावडर, मिरची पावडर, मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे.
  5. जीरे पावडर, साखर आणि 1/2 लि. पेक्षा थोडे जास्त पाणी घालावे, झाकण ठेवून 15 मिनिटे शिजवावे.
  6. ताजा कढीपत्ता व कापलेल्या कोथिंबीरीच्या काड्या घालाव्यात. स्लाईस केलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात.
  7. दूध घालून चांगले मिसळून घ्यावे. करी पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे. सूप मिनिटभर उकळू द्यावे. सजविण्यासाठी भात ( अंदाजे 1 मुठभर ) घालावा . प्यायला देण्यापूर्वी लिंबाचा रस घालावा . गरमागरम प्यायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर