मुख्यपृष्ठ / पाककृती / मशीनशिवाय घरी बनविलेले कॅप्यूचिनो

Photo of Homemade Cappuccino Without Machine by Moumita Malla at BetterButter
3223
41
4.2(0)
0

मशीनशिवाय घरी बनविलेले कॅप्यूचिनो

Jan-17-2016
Moumita Malla
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • अमेरीकन
  • व्हिस्कीन्ग
  • हॉट ड्रींक
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 1

  1. दूध - अर्धा कप
  2. इन्स्टंट कॉफी पावडर - सवा लहान चमचा
  3. साखर - 2 लहान चमचे (किंवा तुमच्या आवडीनुसार)
  4. पाणी - अर्धा लहान चमचा
  5. एक कॉफी मग
  6. एक रवि

सूचना

  1. एक कॉफी मग घ्या, त्यात कॉफी पावडर आणि साखर घालून नीट हलवा आणि त्यात पाणी घाला, आता साखर विरघळेपर्यंत काटा चमच्याने हलवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत रहा. बाजूला ठेवा.
  2. एका चहाच्या भांड्यात दूध घ्या, मंद आचेवर दूध गरम करा, परंतु उकळू देऊ नका. रविने फेटायला सुरुवात करा. दूध उकळण्याआधी किंवा गरम झाल्यानंतर आचेवरून खाली उतरावा.
  3. दूध गरम झाले की जोपर्यंत दूध फेसाळ होत नाही तोपर्यंत रवि दुधात ठेऊन फिरवा. फेस येण्यासाठी ही क्रिया अतिशय जलद करा. इच्छित प्रमाणात फेस येईपर्यंत हलवीत रहा. हे तुम्हाला अतिशय जलद करावे लागेल, अन्यथा दूध थंड होईल.
  4. गरम केलेले दूध कप तीन चतुर्थांश भरेपर्यंत हळुवारपणे कॉफी मिश्रणात ओता. एक चमचा घ्या आणि त्याने राहिलेला फेस त्या कॉफीवर ओता.
  5. तुमचे घरी बनविलेले कॅप्यूचिनो वाढण्यासाठी तयार आहे. कॅप्यूचिनो अधिक अचूक बनविण्यासाठी, फेसाळ दुधावर थोडा कोको पावडर किंवा किसलेले चॉकलेट शिंपडा किंवा चॉकलेट सॉसने डिझाईन करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर