मुख्यपृष्ठ / पाककृती / गोवन छोले (चणे) झाक्युटी

Photo of Goan chole ( chickpea) xacuti by Freda Dias at BetterButter
6693
96
4.7(0)
0

गोवन छोले (चणे) झाक्युटी

Jan-20-2016
Freda Dias
720 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • गोवा
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 वाटी छोले
  2. एकदम बारीक पेस्ट बनविण्यासाठी:
  3. 1 वाटी खवलेले ताजे नारळ
  4. 3-4 काश्मिरी लाल मिरच्या
  5. 1/4 वाटी धणे
  6. 5 मोठे मिरे/15 लहान मिरे
  7. 5-6 लवंगा
  8. 4-5 हिरवे वेलदोडे
  9. 1 दगडफूल
  10. 1 जायपत्री
  11. 1 लहान चमचा बडीशेप
  12. 1 मोठे चमचा खसखस
  13. 2 इंच दालचिनी
  14. फोडणीसाठी:
  15. 1 लहान चमचा मोहरी
  16. 2 मोठे चमचे वनस्पती तेल
  17. इतर साहित्य :
  18. अर्धा लहान चमचा हळद
  19. सुमारे 10-15 पाने असलेली कडीपत्त्याची 1 काडी
  20. मीठ चवीनुसार

सूचना

  1. छोले धुवा आणि रात्रभर पुरेशा पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेशर कुकरमध्ये पुरेसे पाणी आणि मीठ घालून चणे मऊ होईपर्यंत शिजवा.
  2. मध्यम कमी आचेवर कढई ठेऊन त्यात थोडे तेल घालून कांदा भाजा. कांदा गुलाबी झाला की त्यात खोबरे घालून पुन्हा एक किंवा दोन मिनिट किंवा खोबरे गुलाबी होईपर्यंत भाजा. कढईतून काढा आणि बाजूला ठेवा.
  3. त्याच कढईत मंद आचेवर सुगंध येईपर्यंत धणे भाजा.
  4. नंतर त्यात लाल मिरच्या, मिरे, लवंगा, हिरवे वेलदोडे, दगडफूल (यातून बिया काढून टाका नाहीतर रस्सा कडू होईल), जायपत्री, बडीशेप, खसखस घालून 2-3 मिनिटे भाजा, मसाले जळू देऊ नका.
  5. भाजलेल्या मसाल्यांसह परतलेला कांदा, भाजलेले खोबरे थोडे पाणी घालून वाटून लुसलुशीत पेस्ट बनवा (सुमारे 1 कपच पाणी घाला).
  6. एका खोलगट पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडवा.
  7. नंतर मोहरी आणि तेलात वाटून तयार केलेला मसाला मिसळा.
  8. कडीपत्ता, हळद घालून मसाला पेस्टला जोपर्यंत तेल सुटत नाही आणि एकजीव होत नाही तोपर्यंत परता.
  9. आता त्यात शिजवलेले छोले घाला, मसाला त्यांना पूर्णपणे लागेल असे हलवून घ्या. मसाल्याच्या जारमध्ये थोडे पाणी घालून मसाल्याचा उरलेला अर्क फिरवून घ्या आणि तो पॅनमध्ये घाला.
  10. रश्याची सुसंगतता हव्या त्या प्रमाणात आणण्यासाठी त्यात पाणी घाला. आणि 5 मिनिटे मध्यम आचेवर उकळू द्या. मसाल्याचा स्वाद चाखा आणि आवश्यकतेनुसार त्यांना घाला. भाताबरोबर गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर