मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा वडा

Photo of SAGO Vada by Minal Sardeshpande at BetterButter
576
6
0.0(0)
0

साबुदाणा वडा

Dec-14-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा वडा कृती बद्दल

उपासाची पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. 200 ग्रॅम साबुदाणा
  2. दोन बटाटे
  3. चार ओल्या मिरच्या
  4. अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट
  5. अर्धी वाटी उपास भाजणी
  6. मीठ
  7. जिरे पावडर पाव चमचा
  8. तेल तळणीसाठी

सूचना

  1. साबुदाणा धुवून रात्री अर्धा इंच पाणी वर येईल असे घालून भिजवावा.
  2. सकाळी बटाटे धुवून उकडून घ्यावेत
  3. उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्यावेत.
  4. मिरची पेस्ट करावी.
  5. एक परातीत भिजवलेला साबुदाणा, बटाटा, दाण्याचं कूट, मीठ, भाजणी, मिरची पेस्ट जीरं पावडर सगळं एकत्र करावे.
  6. चव घेऊन घट्ट भिजवावे.
  7. कढईत तेल तापत ठेवावे.
  8. तेल तापेपर्यंत एक गोळी घेऊन पुरीसारखा वडा थापून घ्यावा.
  9. तेल तापले की दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत वडा तळावा.
  10. गरम वडा दही, चटणी बरोबर द्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर