मुख्यपृष्ठ / पाककृती / चणे आणि ब्रोकोलीचे कटलेट

Photo of Chickpea and Broccoli Cutlets by Neelima Katti at BetterButter
2981
235
4.8(0)
0

चणे आणि ब्रोकोलीचे कटलेट

Jan-28-2016
Neelima Katti
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • एअर फ्रायिंग
  • बेकिंग
  • अॅपिटायजर
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धी वाटी भिजवलेले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले काबुली चणे
  2. अर्धी वाटी ब्रोकोलीची फुले
  3. 1 लहान बारीक चिरलेला कांदा
  4. मीठ स्वादानुसार
  5. 1 लहान चमचा बारीक चिरलेली मिरची (किंवा स्वादानुसार)
  6. 1/4 लहान चमचा धणेपूड
  7. चाट मसाला - 1/4 लहान चमचा
  8. ताजी कोथिंबीर - 1 लहान जुडी
  9. लिंबाचा रस - 1 मोठा चमचा

सूचना

  1. काबुली चणे नरम होईपर्यंत किंवा हाताने कुस्करता येतील इतके शिजवा. याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
  2. ब्रोकोलीच्या फुलांना पुरेशा पाण्यात थोडावेळ उकळवून घ्या, नंतर त्याला थंड पाण्यात घाला, ज्यामुळे त्यांचा हिरवा रंग कायम राहील.
  3. नंतर किसणीने ब्रोकोलीला किसून घ्या आणि चण्याच्या मिश्रणात मिसळा.
  4. नंतर या मिश्रणात चिरलेला कांदा, मीठ, धणेपूड, चाट मसाला, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला.
  5. सर्व एकत्र केल्यानंतर याचे गोल किंवा लंबगोलाकार पेटीस बनवा.
  6. 180 अंश सेल्सियस तापमानावर 15 मिनिटे ऐअर फ्राय करा. 10 मिनिटांनंतर त्यांना पलटवा. तुम्हाला तळायचे असतील तर तळू शकता किंवा सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतू पण शकता.
  7. उत्कृष्ट स्वादासाठी गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर