Photo of Misal pav by Rohini Rathi at BetterButter
617
4
0.0(0)
0

मिसळपाव

Dec-20-2017
Rohini Rathi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिसळपाव कृती बद्दल

मिसळपाव हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध न्याहारी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मटकी एक कप
  2. तेल दोन टेबल स्पून
  3. बारीक चिरलेला कांदा एक
  4. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  5. आलं-लसणाची पेस्ट 1 टेबल स्पून
  6. गरम मसाला एक टेबलस्पून
  7. बारीक चिरलेली कोथंबीर
  8. बारीक चिरलेला कांदा
  9. बारीक चिरलेला टोमॅटो
  10. फरसाण एक कप
  11. पाव 1 डझन
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम मटकी स्वच्छ पाण्यात धुवून चार तास भिजत ठेवावी
  2. मटकी तील पाणी काढून कोरडे करून मोडण्यासाठी गरम कापडात तीन ते चार ते पाच तास गरम जागेवर ठेवावे
  3. मोड आलेल्या मठाला स्वच्छ धुवून घ्यावे
  4. नंतर कुकरमध्ये मोड आलेले मठ अर्धा टीस्पून हळद आणि मीठ घालुन एकत्र घेऊन शिजवून घ्यावे
  5. एका कढईत तेल गरम करून घ्यावे त्यात कांदा-टोमॅटोची प्युरी करून घ्यावी
  6. मध्यम आचेवर कांदा-टोमॅटोची प्युरी परतून घ्यावी
  7. प्युरी मध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर गरम मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  8. नंतर शिजवलेली मोड आलेली मटकी वरील मिश्रणात टाकून पाणी घालून एक उकळी येईपर्यंत शिजवावी
  9. चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यावी
  10. पाव बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो फरसाण कोथंबीर घेऊन मटकी सोबत खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर