मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक वाटाणा कचोरी

Photo of Spinach green pea kachori by Rohini Rathi at BetterButter
717
8
0.0(0)
0

पालक वाटाणा कचोरी

Jan-02-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक वाटाणा कचोरी कृती बद्दल

कचोरीच्या कणकेत पालक पुरी मिसळून तयार केलेली ही कचोरी खाण्यास खूप स्वादिष्ट लागते कचोरी च्या आतील सारणात वाटाणे घालून तयार केलेली ही कचोरी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वटाणा एक कप
  2. हिरवी मिरची दोन
  3. लसणाच्या पाकळ्या चार ते पाच
  4. आलं छोटा तुकडा
  5. गरम मसाला एक टीस्पून
  6. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  7. हळदी अर्धा टीस्पून
  8. साखर एक चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल एक टेबल स्पून
  11. आवरणासाठी
  12. अर्धा कप मैदा
  13. अर्धा जुडी पालकाची प्युरी
  14. तेल एक टेबल स्पून
  15. मीठ चवीनुसार
  16. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम कचोरीच्या सारणासाठी सर्व साहित्य जमा करून घ्यावे
  2. नंतर मिक्सर मध्ये हिरवी मिरची वाटाणा आलं-लसूण जाडसर वाटून घ्यावे
  3. कढईत तेल गरम करून वाटाण्याची मिश्रण व बाकी सर्व मसाले बेसन पीठ घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे
  4. कचोरीचे सारण थंड करण्यास ठेवावे
  5. आवरणासाठी सर्व साहित्य जमा करून घ्यावे
  6. मैदा चाळणीने चाळून घ्यावा
  7. सर्व साहित्य एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्यावे
  8. कणकेचे छोटे गोळे करून हातावर छोटी पोळी बनवून घ्यावे व त्यात वरील सारण घालून हाताने दाबून कचोरी बनवून घ्यावी
  9. तयार कचोरी गरम तेलात तळून घ्यावी
  10. अशाप्रकारे सर्व कचोर्‍या तळून घ्याव्यात
  11. गरम गरम कचोरी हिरव्या चटणी किंवा चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर