Photo of Ragada pattis by Rohini Rathi at BetterButter
908
9
0.0(1)
0

Ragada pattis

Jan-03-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रगडासाठी
  2. हिरवे वाटाणे एक कप
  3. उकडून घेतलेले बटाटे दोन
  4. कांदा आणि टोमॅटो दोन-दोन
  5. तेल दोन टेबल स्पून
  6. हिरवी मिरची पेस्ट एक टेबल स्पून
  7. किसलेल आले एक टिस्पून
  8. लसूण एक टिस्पून
  9. हळदी पावडर अर्धा टीस्पून
  10. गरम मसाला पाव टीस्पून
  11. धणे-जिरे पावडर दोन टीस्पून
  12. मीठ चवीनुसार
  13. पॅटीस बनवण्यासाठी
  14. उकडून घेतलेले बटाटे चार मोठे
  15. वटाणे तीन टेबलस्पून
  16. हिरवी मिरची पेस्ट एक टेबलस्पून
  17. जीरा 1 teaspoon
  18. लिंबाचा रस दोन टीस्पून
  19. बारीक चिरलेली कोथिंबीर एक टेबल स्पून
  20. ब्रेडचा चुरा अर्धा कप
  21. मीठ चवीनुसार
  22. तेल पॅटीस भरण्यासाठी
  23. चाट बनवण्याची साहित्य
  24. बारीक चिरलेला कांदा
  25. बारीक शेव अर्धा कप
  26. बारीक चिरलेली कोथंबीर आर्धा कप
  27. दही एक कप
  28. हिरवी चटणी एक कप
  29. चिंचेची चटणी एक कप

सूचना

  1. रगडा बनवण्यासाठी कुकरमध्ये वाटाणे नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे
  2. वाटाणे थोडेशे कुस्करून घ्यावे
  3. बटाट्याची साले काढून त्याला किसून घ्यावे
  4. टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून प्युरी बनवून घ्यावी
  5. कांदा बारीक कापून घ्यावा
  6. तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा नंतर त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट आलं लसूण हळद मीठ गरम मसाला धने जिरे पावडर मीठ व टोमॅटोची प्युरी घालून थोडेसे परतून घ्यावे
  7. उकडलेले बटाटे बटाटे व आवश्यकतेनुसार पाणी घालून रगडा थोडा वेळ पर्यंत शिजवुन घ्यावा
  8. पॅटीस बनवण्यासाठी उकडलेले बटाटे किसून घ्यावे
  9. नंतर त्यात वटाणा हिरवी मिरचीची पेस्ट जिरं लिंबाचा रस कोथिंबीर ब्रेडचा चुरा मी सगळं व्यवस्थित मिसळून घ्यावे
  10. त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोल पॅटिस बनवून घ्यावे
  11. तव्यावर थोडे तेल टाकून तयार पॅटीस बाजूंनी लाल होईपर्यंत भाजून घ्यावे.( हे मिश्रण थोडे नरम वाटत असेल तर त्यात थोडासा कॉनफ्लॉवर मिसळून घ्यावा)
  12. वाढण्याच्या वेळी डिशमध्ये पॅटीस ठेवून त्याच्या वरती गरम-गरम रगडा घालून वरती स्वादानुसार लाल मिरची पाउडर गली हिरवी चटणी चिंचेची चटणी टाकावी
  13. वरतून दही बारीक चिरलेला कांदा घालून सर्व करावा
  14. अशाप्रकारे तयार आहे रगडा पॅटीस

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-18-2018
tejswini dhopte   Aug-18-2018

Mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर