Photo of Vegetables  manchurian by Rohini Rathi at BetterButter
519
8
0.0(0)
0

मंचुरीयन

Jan-03-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मंचुरीयन कृती बद्दल

सर्व भाज्या वापरून तयार केलेले हे मंचुरियन खाण्यास खूप स्वादिष्ट लागते या कृतीने तयार केलेले मंचुरियन खाण्यास हॉटेलमधील मंचुरियन सारखेच लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. किसलेली पत्ताकोबी एक कप
  2. किसलेला गाजर आर्धा कप
  3. किसलेला कांदा तीन टेबलस्पून
  4. बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन टीस्पून
  5. बारीक केलेला लसूण दोन टेबल स्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. मैदा 3 टेबलस्पून
  8. कॉर्नफ्लोर पावडर दोन टेबल स्पून
  9. सोडा-चिमुट्भर
  10. तेल एक टेबल स्पून
  11. तेल तळण्यासाठी
  12. सॉस बनवण्यासाठी
  13. तेल दोन टेबल स्पून
  14. बारीक चिरलेला लसूण एक टेबल
  15. बारीक चिरलेला आलं 1 टिस्पून
  16. बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन टीस्पून
  17. अजिनोमोटो चिमूटभर
  18. सोया सॉस एक टेबल स्पून
  19. मीठ चवीनुसार
  20. कॉनफ्लॉवर एक टेबल स्पून
  21. काळी मिरी पावडर चवीनुसार

सूचना

  1. मंचूरियन न चे सगळे साहित्य एकत्र मिळून छोटे छोटे गोल गोळे बनवून घ्यावे ( मंचूरियन चे मिश्रण जर पात्र वाटत असेल तर त्यात थोडासा मैदा किंवा कोण फ्लॉवर घालून घ्यावी)
  2. मध्यम आचेवर मंचूरियन तळून घ्यावे
  3. सॉस बनवण्यासाठी तेल गरम करून त्यात आलं लसूण हिरवी मिरची अजिनोमोटो टाकून थोडेसे परतून घ्यावेत
  4. नंतर त्यात पाणी सोया सॉस मीठ व काळी मिरी घालून मिसळून घ्यावी
  5. थोड्या थंड पाण्यात काम फ्लॉवरची पेस्ट बनवून सॉसमध्ये टाकावी
  6. सॉस घट्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत राहावे व शिजवून घ्यावे
  7. सॉसमध्ये तयार मांचुरियन व कोथंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर