मुख्यपृष्ठ / पाककृती / बॉम्बे चपाती सँडविच

Photo of Bombay chapati sandwhich by Rohini Rathi at BetterButter
520
8
0.0(0)
0

बॉम्बे चपाती सँडविच

Jan-05-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बॉम्बे चपाती सँडविच कृती बद्दल

सँडविच लहान मुलांचा आवडता पदार्थ आहे ब्रेड चा वापर न करता चपाती वापरून तयार केलेला हा सॅंडविच खाण्यास खूप पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चपाती 5
  2. गाजर 3
  3. काकडी 2
  4. टोमॅटो 2
  5. कांदे दोन
  6. बीट 1
  7. लोणी दोन टेबल स्पून
  8. चीज अर्धा कप
  9. हिरव्या चटणीसाठी
  10. कोथंबीर एक कप
  11. हिरवी मिरची दोन
  12. जीरा 1 टिस्पून
  13. मीठ चवीनुसार
  14. शेंगदाणे पाव कप
  15. दही दोन टेबल स्पून
  16. साखर एक टी-स्पून जून

सूचना

  1. सर्वप्रथम हिरवी चटणी बनवून घ्यावी यासाठी चटणी चे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यावे
  2. गाजर काकडी टोमॅटो कांदा बीट गोल आकारात कापून घ्यावा
  3. सर्वप्रथम एक पोळी घेउन त्यावर हिरवी चटणी चमच्याने सर्व बाजूंनी पसरवून त्यावर ती काकडीची सर्व बाजूंनी ठेवून द्यावे
  4. नंतर त्यावर ती चीज किसणीने किसून सर्व बाजूंनी टाकून घ्यावा
  5. दुसरी पोळी चपाती घेऊन त्यावर ती हिरवी चटणी लावून ती चपाती काकडीच्या वरती ठेवून त्यावर गाजर व टोमॅटोची स्लाईसेस ठेवावी
  6. त्यावरती किसनीने चीज घालून घ्यावा
  7. तिसरी पोळी घेउन त्यावर ती हिरवी चटणी चमच्याने लावून ती पोळी गाजराच्या वरती ठेवून त्यावर कांदा व बीड च्या स्लाईस ठेवून घ्याव्या
  8. चौथी पोळी घेउन त्यावर ती हिरवी चटणी लावून उरलेली सर्व काकडी गाजर कांदा टोमॅटो असलेली स्लाईस ठेवून त्यावर चीझ घालून घ्यावा
  9. शेवटी पाचवी पोळी घेऊन चौथ्या पोळीवर ठेवावी व हाताने सर्व बाजूंनी दाबून घ्यावी
  10. एका नॉनस्टिक पॅनमध्ये लोणी गरम करून तयार पोळ्यांची सँडविच त्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावे
  11. अशाप्रकारे तयार सँडविच हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर