Photo of Guravali by Savita Sarpotdar Deshpande at BetterButter
1024
6
0.0(3)
0

Guravali

Jan-08-2018
Savita Sarpotdar Deshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी बारीक रवा
  2. अर्धी वाटी मैदा
  3. 2 टीस्पून साजूक तूप
  4. चिमूटभर मीठ
  5. पाणी आवश्यकतेनुसार
  6. अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे
  7. 2 टीस्पून खसखस
  8. 1वाटी पिठीसाखर
  9. 1टीस्पून वेलची पावडर
  10. तळण्यासाठी साजूक तूप
  11. अर्धी वाटी तांदूळ पिठी लाटण्यासाठी
  12. सगळ्यात महत्त्वाचे साहित्य - जाईचया कळ्या

सूचना

  1. रवा,मैदा, 2 तिसळून तूप, चिमूटभर मीठ हे एकत्र करून पाणी घालून घट्ट गोळा मळून तासभर ठेवा
  2. किसलेले खोबरे आणि खसखस वेगवेगळी खमंग भाजून मिक्सरमधून खुप बारीक वाटून घ्या. त्यात वेलची पूड आणि पिठीसाखर मिसळून सारण तयार करा.
  3. आता मळलेला गोळा किंचित पाण्याचा हात लावून भरपूर मळा. पुरणपोळीच्या कणकेपेक्षा किंचित घट्ट गोळा हवा. या गोळ्यातून एक पुरीएवढी गोळी घ्या.तिला वाटीचा आकार देऊन त्यात मावेल इतकं सारण घाला. वाटीचं तोंड बंद करून तांदळाच्या पाठीवर हलक्या हाताने लाटा.
  4. आता गरम तुपात ही पुरी ज्या बाजूने तोंड बंद केलं टी बाजू बार ठेवून सोडा. थोडी फुगली की लगेच उलटा. पळीने तिच्यावर कढाईतलं तूप घालत राहा. मंदाग्नीवर सावकाश तळा. अशा सगळ्या गुरवळ्या तयार करून घ्या.
  5. आता थंड झालेली एक गुरवळी हातात घेऊन तिला दाभणाने 4-5 भोके पाडा आणि त्यात ४-५ जाई च्या कळ्या घाला. असं सगळ्या गुरावळ्यांचं करायचं.
  6. संध्याकाळी किंवा दुसर्या दिवशी खाताना प्रत्येक जण ही गुरवळी फोडतो तो काय... आतून पूर्ण उमललेली जाईची फुले बाहेर पडतात आणि सगळेच खूप खुश आणि आश्चर्य चकीत होतात.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Tanuja Joshi
Jan-09-2018
Tanuja Joshi   Jan-09-2018

Tanuja Joshi

Ashok Patil
Jan-08-2018
Ashok Patil   Jan-08-2018

अरे व्वा....चक्क जाईच्या कळ्या ? प्रथमच मी पाहात आहे. "गुरवळ्या" नामदेखील लक्ष खेचून घेणारे आहे दीप्ती....."सावकाश तळायच्या..." ~ तू हे काम सुरेखच करत असणार. मी बाजूला बसलो आहे खुर्चीत आणि पाहात आहे तुझी करामत असे दृश्य आले समोर. मस्तच.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर