मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाचे लाडू

Photo of Fresh Coconut ladoo by Aarti Nijapkar at BetterButter
1184
8
0.0(0)
0

ओल्या नारळाचे लाडू

Jan-09-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाचे लाडू कृती बद्दल

ओल्या नारळाचे लाडू सोपे व झटपट होणारे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1.  खवलेला ओला नारळ ३ कप
  2. साखर १ १/२ कप
  3. दूध १ १/२ कप
  4. वेलचीपूड १ लहान चमचा
  5. बदामाचे काप २ मोठे चमचे
  6. तूप १ मोठा चमचा
  7. केशर आवडीप्रमाणे 
  8. काळे बेदाणे सजावटीसाठी

सूचना

  1. एका पातेल्यात खवलेला ओला नारळ, साखर  आणि दूध एकत्र करावे. मध्यम आचेवर  ठेवून परतावे .
  2. पातेल्याच्या तळाला नारळ (मिश्रण ) चिकटू नये म्हणून ढवळत राहावे. दूध आटेपर्यंत परतत रहा. 
  3. मिश्रण एकजीव झाल्यावर वेलचीपूड आणि बदामाचे काप व केशर  घालावे. मिश्रण घट्टसर होत आले कि गॅस बंद करावा आणि पातेले गॅसवरून उतरवावे.
  4. मिश्रण थोडे कोमटसर होवू द्यावे.  थोडासा तुपाचा हात घेऊन लाडू वळावेत.
  5. लाडू वळून झाल्यावर त्यावर काळे बेदाणे लावावे  खाण्यास तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर