मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिराची खिर

Photo of Rajgira Khir by Archana Lokhande at BetterButter
569
5
0.0(0)
0

राजगिराची खिर

Jan-10-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिराची खिर कृती बद्दल

उपवासासाठी अतिशय उपयुक्त आहे. उपवासा दिवशीही काहीतरी चेंज. मी ही खिर पहिल्यांदा बनवली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी राजगिरा
  2. १/२ लिटर दुध
  3. १/२ वाटी साखर
  4. २ चमचे साजूक तूप
  5. २ चमचे विलायची पावडर
  6. १ चमचा किसलेले सुके खोबरे
  7. काजू, बदाम आवडीनुसार

सूचना

  1. १० मिनीटे राजगिरा पाण्यात भिजवून घेतला.
  2. नंतर मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतली.
  3. एका पातेल्यात दुध तापण्यास ठेवले.
  4. दुध उकळले की, राजगिरा पेस्ट टाकून ५ मिनीट पुन्हा एक उकळी काढली.
  5. नंतर तुप,साखर, विलायची पावडर, खोबरा किस, काजु, बदाम घालून मिक्स केले आणि १ मिनीट झाकण ठेऊन गँस बंद केला.
  6. झाली आपली राजगिरा खिर तयार. खुप छान झाली आहे.मी सुध्दा पहिलांदच बनवली आहे. कशी झाली आहे सांगा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर