मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पुडिंग

Photo of Bread pudding by Teesha Vanikar at BetterButter
1559
5
0.0(0)
0

ब्रेड पुडिंग

Jan-11-2018
Teesha Vanikar
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पुडिंग कृती बद्दल

ही पुडिंग बिना अंड्याची आहे, त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी गोडाचा अजुन एक प्रकार जेवणात किवा इतर वेळी.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ५ ब्रेड स्लाइस
  2. १ कप साखर
  3. दुध दिढ कप
  4. ७/८ चमचे कस्टर्ड पावडर
  5. ४ चमचे दुध पावडर
  6. २ चमचे बदाम ड्रिंक पावडर

सूचना

  1. प्रथम ब्रेड च्या कडा कापुन घ्या.
  2. मिक्सीमध्ये जाडसर वाटून घ्या.
  3. दुध तापवायला ठेवा.
  4. केक टीन गॅसवर गरम करायला ठेवा त्यात २ चमचे साखर व २ चमचे पाणी घालून साखर कॅरॅमलाईज करून, बाजूला ठेवा.
  5. दुध तापल्यावर त्यात साखर घालून ढवळा,व त्यात कस्टर्ड पावडर हळुहळु घाला.
  6. मिश्रण चांगले ढवळा, दुध थोडे घट्ट झाल्यावर त्यात दुध पावडर व बदाम पावडर घाला.
  7. मिश्रण खूप घट्ट झाले की त्यात ब्रेड चा चुरा घाला व चमच्याने ढवळत रहा व लगेच गॅस बंद करा
  8. आता तयार मिश्रण कॅरॅमलाईज्ड केक टीनमध्ये ओता .
  9. कुकरमध्ये पाणी घालून त्यात रिंग किव्वा स्टँड ठेवून केक टींन त्यावर ठेवा.
  10. कुकरची शिट्टी व रिंग काढून झाकण बंद करा व गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा.
  11. ४० मी. नंतर गॅस बंद करून केक टी न बाहेर काढा,थोडे थंड झाल्यावर प्लेटमध्ये टी न उलटा करून पुडिंग काढून घ्या.
  12. हव्या त्या आकारात कापून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर