मुख्यपृष्ठ / पाककृती / प्लमचा शिरा / रवा केसरी

Photo of Plum Halva / Shira by Dr.Shubhangi Kumbhar at BetterButter
702
3
0.0(0)
0

प्लमचा शिरा / रवा केसरी

Jan-14-2018
Dr.Shubhangi Kumbhar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्लमचा शिरा / रवा केसरी कृती बद्दल

शिरा हा नैवेद्य म्हणुन दाखवला जातो आणि तो बनवण्यासाठी सर्वात सोपा, मधुर आणि सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. त्यामध्ये फळांचा समावेश केल्यास तो अधिकच पौष्टिक पदार्थ बनु शकतो. तर हा हेल्दी प्लम शिरा नक्की करून पहा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. रवा १ कप
  2. साखर १ कप
  3. प्लमचे फळ १
  4. दुध २ कप
  5. तुप २ मोठे चमचे
  6. केसर १ लहान चमचा
  7. ड्राय फ्रुट्स सजावटीसाठी

सूचना

  1. एका कढईत तूप गरम करा व तुप गरम त्यात रवा घालून गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्या.
  2. रव्याचा  छान वास सुटला कि, त्यात प्लमची प्युरी करून किंवा छोटे छोटे तुकडे करुन घाला आणि परतुन घ्या.
  3. रवा आणि प्लम छान मिक्स झाले की मग त्यामध्ये दुध घाला आणि ५ मिनिटे झाकून ठेवा, रवा शिजून फुलून येईल.
  4. आता शिजलेल्या रव्यात साखर घालून नीट मिक्स करा.
  5. झाकण ठेवुन वाफेवर साखर विरघळली कि, थोड्यावेळानी बदाम, बेदाणे, काजुने सजावट करुन शिरा सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर