Photo of PATOLE by Minal Sardeshpande at BetterButter
1540
6
0.0(2)
0

PATOLE

Jan-15-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाट्या काकडीचा कीस
  2. दोन वाट्या गूळ
  3. दोन वाट्या तांदूळ पीठ
  4. एक वाटी ओलं खोबरं
  5. चिमुटभर हळद
  6. मीठ चवीपुरते
  7. वेलची पावडर अर्धा टीस्पून
  8. हळदीची पाने सात आठ

सूचना

  1. हळदीची ओली पाने स्वच्छ धुवून पुसून ठेवा.
  2. साहित्य
  3. तांदूळाचे रवाळ पीठ घ्या.
  4. पीठ रवाळ नसेल तर चार चमचे रवा मिसळा.
  5. काकडी किसून मोजून घ्या.
  6. काकडीचा कीस, गूळ, वेलची पावडर, हळद कढईत एकत्र करा.
  7. गूळ विरघळला की त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करा.
  8. पाच मिनिटं छान वाफ येउद्या. वाफ आली की गार करायला ठेवा.
  9. तयार पीठ
  10. तोपर्यंत हळदीची पाने मधोमध दुमडा
  11. पानाच्या मागच्या बाजूला तूप लावा.
  12. एका पातेल्यात पाणी घ्या.
  13. त्यात पसरत डबा ठेवा, त्यातही पाणी घ्या.
  14. त्यावर चाळण ठेवा.
  15. त्यात वाटी उपडी ठेवा.
  16. तयार पीठ पानाच्या मागच्या बाजूला अर्ध्या पानाला लावा.
  17. अशाप्रकारे लावा.
  18. अर्धं पान त्यावर दुमडा.
  19. तयार पान वाटीच्या भोवती चाळणीत उभी करा.
  20. उभी केलेली पानं
  21. झाकण ठेवा
  22. पंधरा मिनीटं मोठ्या गॅसवर छान वाफ येउद्या.
  23. पंधरा मिनिटांनी पाहा,पातोळे तयार आहेत.
  24. गार किंवा गरम साजूक तुपासोबत अप्रतिम!!!

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-19-2018
Sudha Kunkalienkar   Jan-19-2018

तांदळाचे पीठ किती घ्यायचं ?

pranali deshmukh
Jan-15-2018
pranali deshmukh   Jan-15-2018

Innovative

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर