मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरणाचे मोदक

Photo of Purnache Modak by pranali deshmukh at BetterButter
1160
7
0.0(0)
0

पुरणाचे मोदक

Jan-15-2018
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणाचे मोदक कृती बद्दल

गणपती बाप्पांचं आगमन झालं कि दहा दिवस वेगवेगळ्या मोदकांची रेलचेल असते .त्यामध्ये एक दिवस पुरणाच्या मोदकाचा असतो . बाप्पाना मोदक भारी प्रिय त्यात पुरणाचे म्हटल्यावर विचारायलाच नको .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी चणा डाळ
  2. सव्वा वाटी साखर
  3. 1/2 वाटी कणिक
  4. 1 वाटी साजूक तूप
  5. 1tsp वेलची पावडर
  6. 1 tsp जायफळ पावडर

सूचना

  1. चणा डाळ धुवून कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून शिजवा .तीन ते चार शिट्यांमध्ये डाळ मऊ शिजते .
  2. साखर घालून एकजीव करून मिक्सर मधून काढा .
  3. कढईत मंद आचेवर चमच्याने सारखे ढवळत राहा .
  4. जेव्हा सरता किंवा चमचा पुराणाच्या मध्यभागी ठेवल्यावर तो स्थिर राहील पडणार नाही .तेव्हा समजायचं पुरण तयार झालं. त्यामध्ये जायफळ ,वेलची पावडर घालून मिक्स करा .
  5. कणिक गाळून त्यात तेलाचे मोहन आणि मीठ घसळून घट्ट मळून घ्या .
  6. एक मोठी पोळी लाटा .गोल गोल आकार कापा .तुम्ही छोटी वाटी किंवा धारदार झाकणाचा वापर करून गोल सारख्या पारी घेऊ शकता.
  7. त्यामध्ये चमच्याने पुरण भरा.निऱ्या पाडा .सर्व निऱ्या जवळ आणून बंद करा .कमळ जसे पाकळ्या मिटते तसे .
  8. कढईत तूप टाका .तापले कि माध्यम आचेवर मोदक तळून घ्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर