Photo of Chirote by Archana Lokhande at BetterButter
1086
10
0.0(0)
0

चिरोटे

Jan-16-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
100 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिरोटे कृती बद्दल

चिरोटे - हे डायबेटिस स्पेशल आहेत. यांना जास्त गोड चालत नाही ना.म्हणून या प्रकारे केले आहेत.

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा २ वाटी
  2. रवा ४ चमचे
  3. तुप २ चमचे
  4. मीठ चिमूटभर
  5. सोडा चिमूटभर
  6. दुध १ ते १ १/२ वाटी
  7. तेल तळण्यासाठी
  8. पिठीसाखर २-३ चमचे
  9. साठ्यासाठी
  10. १ चमचा तांदळाचे पीठ
  11. १ चमचा तुप

सूचना

  1. एका भांड्यात मैदा चाळून घ्या त्यात रवा, मीठ आणि सोडा घालून मिक्स करा.
  2. तुप थोडे गरम करून पिठात ओतून मिक्स करा.
  3. आता त्यात लागेल तसे दुध घालून घट्ट मळून एक तास बाजूला ठेवून द्या.
  4. पिठ भिजेपयँत आपण साठा बनवून घेऊ.त्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ आणि एक चमचा तुप एकत्र घेऊन मिक्स करा.
  5. आता भिजवलेले पिठ छान एकजीव करून त्याचे तीन गोळे करून पोळीप्रमाणे लाटून घ्या.
  6. एक पोळीवर तयार साठा लावा.याप्रमाणे तिन्ही पोळ्या एकवर एक ठेऊन गोल गुंडाळून त्याच्या लाट्या तयार करून घ्या.
  7. एक एक लाटी जाडसर लाटून तेलात तळून घ्या.
  8. आता तयार चिरोटे एका ताटात घेऊन त्यावर पिठीसाखर भुरभुरा आणि सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर